शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:22 IST

Iran Israel War Latest news: खामेनेई यांना ठार मारण्याची शक्यता तसेच इराणमध्ये सत्तापालट करणे या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे.

तेहरान : इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मदत मागितली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची भेट घेतली आहे. अराघची यांनी पुतिन यांची भेट घेत रशियाचा पाठिंबा मागितला आहे. रशियाच्या पाठिंब्यावर इराण अद्याप खूश नाही. मात्र, इराणला रशियाकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खामेनेई यांना ठार मारण्याची शक्यता तसेच इराणमध्ये सत्तापालट करणे या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे. जर तसे घडले तर मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण होऊ शकते. ही स्थिती रशियाला नको आहे. 

इराणचा अणुकार्यक्रम विकसित करण्यात रशियाने मोलाची मदत केली आहे. त्यामुळे खामेनेई यांनी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मदतीसाठी पुतीन यांना पत्र लिहिले आहे. इराण व अमेरिकेमध्ये मध्यस्थी करण्याची रशियाने याआधीही तयारी दर्शविली होती.

इराणचे सशस्त्र दल प्रमुख अब्दुलरहीम मौसवी म्हणाले की, आमच्या अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना आम्ही तितकेच आणि कठोर प्रत्युत्तर देऊ. इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांना वाचवण्याचा निर्णय घेऊन ट्रम्प यांनी मोठी चूक केली आहे. नेतान्याहू जोपर्यंत आयुष्यातून उठणार नाहीत तोपर्यंत इराण नेतान्याहू यांना शिक्षा देत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

युद्ध आणखी भडकण्याची भीती

अमेरिकेने इराण-इस्रायलच्या युद्धात हस्तक्षेप केल्याने तसेच इराणवरील अणुकेंद्रांवर मारा केल्याने हे युद्ध आणखी भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर देशही यात भरडले जाण्याची भीती आहे. 

जगाचा आण्विक धोका टळला आहे : इस्रायल

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक इराणच्या विनंतीवरून बोलावण्यात आली होती. यात इस्रायलचे राजदूत डॅनी डेनन यांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन करत जगासमोर असलेला धोका संपला असल्याचे नमूद केले.

इस्रायलने इराणला कित्येक वर्षापासून संधी दिली; परंतु हा देश ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. म्हणूनच इस्रायलने पावले उचलली. आमच्या हल्ल्यातशेकडो इराणी सैनिक ठार झाले आहेत, असे इस्रायलने माहिती देताना सांगितले.

ट्रम्प यांनी केली त्यांच्याच मागण्यांची थट्टा : काँग्रेस

इराणवर हल्ले करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशासोबत संवाद सुरू ठेवण्याच्या स्वतःच्याच मागण्यांची थट्टा केली आहे, असे काँग्रेस पक्षाने सोमवारी म्हटले. अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यांविषयी, इस्रायलच्या आक्रमकतेविषयी केंद्र सरकारने टीका किंवा निषेध केलेला नाही. ही अयोग्य कृती आहे. भारताने इराणसोबत तातडीने चर्चा करणे आवश्यक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

४४३ भारतीयांची सुटका

इस्रायलमध्ये अडकलेल्या ४४३ भारतीयांना सोमवारी दुसऱ्या टप्प्यात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यामुळे गेल्या दोन दिवसांत सुटका झालेल्या भारतीयांची एकूण संख्या ६०३ झाली आहे. १९ जूनला भारत सरकारने 'ऑपरेशन सिंधू'ची घोषणा केली. इस्रायलमध्ये सध्या ४०,००० हून अधिक भारतीय आहेत.

हल्ल्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर नाही

अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी भारताच्या हवाई क्षेत्राचा वापर केला या सोशल मीडियावरील काही खात्यांवरून करण्यात आलेला दावा केंद्र सरकारने फेटाळला आहे. अमेरिकेने रविवारी पहाटे इराणमधील तीन अणुकेंद्रांवर बॉम्बहल्ले केले. त्या पार्श्वभूमीवर भारताबाबत ही अफवा पसरविण्यात आली होती. सरकारने म्हटले की, इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारताचा वापर केलेला नाही.

टॅग्स :IranइराणrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्ध