शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा अमेरिकेच्या इराकमधील तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, चार जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:08 IST

इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथील तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली.

तेहरान/बगदाद - कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये वाढलेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. अमेरिकेविरोधात आक्रमक झालेल्या इराणने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून, रविवारी इराणी सैन्याने अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या तळांवर रॉकेट हल्ला केला. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली. यामध्ये चार जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

 मात्र या हल्ल्याची कुठलाही गट किंवा संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र हा हल्ला इराकमधील इराणचा पाठिंबा असलेल्या गटाने केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार इराकमधील अल बलाद एअरबेसवर अमेरिकेच्या लष्करी तळांवर एकूण 8 रॉकेट सोडण्यात आले. ज्यामध्ये चार जण जखमी झाले. अल बलाद एअरबेस इराकमधील एफ-16 विमानांचा मुख्य तळ आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडून खरेदी केली होती. अल बलाद येथील तळावर अमेरिकन हवाई दल आणि कंत्राटदारांचे एक पथकही आहे. मात्र यापैकी अनेक जणांना अमेरिका आणि इराणध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर या तळावरून हटवण्यात आले आहे. युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली

कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करणारा ठराव संमत, ‘डेमोक्रॅटिक’ची खेळीदरम्यान, 8 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याचा हेतू कुठल्याही अमेरिकी सैनिकाची हत्या करण्याचा नव्हता, असा दावा इराणी गार्डने केला आहे. मात्र अमेरिकेच्या हवाई तळावर इराणकडून पुन्हा एकदा करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे हे प्रकरण अद्याप शांत होणारे नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच अमेरिकी सैन्य हे कुठल्याही हल्ल्याला नेहमीच प्रत्युत्तर देत आलेले आहे. त्यामुळा या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अजूनच वाढू शकतो. 

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला असतानाच बुधवारी इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळून 176 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर युक्रेनचे हे प्रवासी विमान चुकून पाडल्याची कबुली इराणने शनिवारी दिली होती. हे विमान उड्डाण करीत असताना तेहरानजवळील लष्करी तळाच्या दिशेने अचानक वळल्याने ते पाडले गेले असावे, असेही इराणने म्हटले होते. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना बगदादजवळ ड्रोन हल्ला करून अमेरिकेने ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर लगेचच युक्रेनचे विमान इराणमध्ये कोसळले होते.  

टॅग्स :IranइराणUnited Statesअमेरिकाqasem soleimaniकासीम सुलेमानी