शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:50 IST

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

Iran President Ebrahim Raisi Death : इराणचेराष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांचे रविवारी(दि.19) हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियान आणि इतर 9 जण होते. सोमवारी इराणच्या माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांसह सर्वांच्या मृत्यूची पुष्टी केली. इराणच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले.

रात्रीचा अंधार आणि खराब हवामानामुळे बचाव कर्मचाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्यासाठी खुप उशीर झाला. पाऊस आणि धुक्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण, सोशल मीडियावर काही लोक या घटनेला इस्रायलचे 'षडयंत्र' म्हणत आहेत. याचे कारण म्हणजे, हमास आणि इस्रायल युद्धात, इराण हमासला उघडपणे पाठिंबा देत आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच इराण आणि इस्रायल, या दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केले. त्या घटनेचा काही दिवसानंतरच इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

दोन हेलिकॉप्टर सुखरूप परतले, रईसींचे हेलिकॉप्टर कोसळलेसोशल मीडियावर इराणचे काही लोक म्हणत आहेत की, रईसींच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते, मग दोन हेलिकॉप्टर सुखरुप पोहोचले अन् नेमके त्यांचेच हेलिकॉप्टर कसेकाय कोसळले? दरम्यान, या घटनेबाबत इस्रायलनेही आपली बाजू मांडली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना इस्रायलच्या एका वरिष्ठ इराणीयन अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, या अपघातात आमची कोणतीही भूमिका नाही.

तज्ञ काय म्हणतात?इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूमागे इस्रायलचा हात असल्याचा दाव्याचे तज्ञ खंडन करतात. इराणच्या राष्ट्राध्यक्षांना ठार मारणे म्हणजे थेट युद्धाची घोषणा करणे, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, इस्रायलने नेहमीच इराणच्या लष्करावर हल्ले केले आहेत, हाय-प्रोफाइल राजकीय व्यक्तींना नाही. दुसरीकडे, अमेरिकन सिनेटर चार शुमर यांनी रईसी यांच्या मृत्यूमागे कोणताही कट नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या अमेरिकन गुप्तचर संस्थांना असा कोणताही पुरावा सापडलेला नाही ज्याच्या आधारे याला कट म्हणता येईल.

टॅग्स :IranइराणPresidentराष्ट्राध्यक्षAccidentअपघातHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाDeathमृत्यूIsraelइस्रायलIndiaभारत