शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Iran News: शाळेवर कोसळले लढाऊ विमान, वैमानिकासह तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:49 IST

कोरोनामुळे शाळा बंद होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

तेहरान:इराणमध्ये एका शाळेच्या इमारतीवर लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. इराणच्या वायव्येकडील तबरीझ शहरात सोमवारी हा अपघात झाला. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 3 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन क्रू मेंबर्स आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे यात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीविताला हानी झाली नाही. पूर्व अझरबैजान प्रांतातील आपत्कालीन ऑपरेशन्सचे प्रमुख होनवर म्हणाले, "इराणी लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर असताना सकाळी 9:00 वाजता शहराच्या मध्यभागी कोसळले." स्थानिक रेड क्रॉस सोसायटीच्या प्रमुखाने सांगितले की, विमान शाळेच्या बाहेरील भिंतीवर कोसळले, यात चालक दल आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

विमान कोसळल्यानंतर परिसरात आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. इराणच्या राज्य वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये, शाळेच्या ढिगाऱ्यामध्ये आगीमुळे काळवंडलेल्या भिंतीजवळ एक लढाऊ विमान जळताना दिसत आहे. हे विमान तबरेझ येथील शाहिद फकोरी एअरबेसवर तैनात करण्यात आले होते.  

टॅग्स :IranइराणairplaneविमानAccidentअपघात