इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलं होतं.
८६ वर्षीय खामेनेई यांचा याच हल्ल्यात मृत्यू झाला. हा हल्ला विशेषतः सरकारी ठिकाणांवर करण्यात आलेली कारवाई होती असं सरकारनं म्हटलं आहे. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. तसेच सात दिवसांची सार्वजनिक सुट्टीही घोषित करण्यात आली आहे. देशभर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मोठ्या शहरांमध्ये आणि सरकारी इमारतींबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.
अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू
कोण आहेत मोजतबा खामेनेई?
मोजतबा खामेनेई यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद शहरात झाला. त्यांचं शिक्षण धार्मिक वातावरणात झालं. इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी 'रिव्होल्युशनरी गार्ड'मध्येही काम केलं होतं. ते दीर्घकाळापासून आपल्या वडिलांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते.
पडद्यामागून अनेक मोठ्या निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असायची असं म्हटलं जातं. त्यांनी कधीही कोणतंही मोठं सरकारी पद भूषवलं नसले तरी, ते आपल्या वडिलांचे विश्वासू सल्लागार होते. लष्कर आणि निमलष्करी दलांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं.
"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल
२००९ मध्ये चर्चेत आले होते मोजतबा खामेनेई
२००९ मध्ये झालेल्या निदर्शनांच्या वेळीही मोजतबा खामेनेई यांचं नाव चर्चेत आलं होतं. आंदोलने कठोरपणे दडपून टाकण्यात त्यांनी भूमिका बजावली होती, असा आरोप काही लोकांनी केला होता. आता ते सर्वोच्च नेते बनल्यानंतर देशात नवीन राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
"आकाशात क्षेपणास्त्रे, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video
१९७९ च्या क्रांतीच्या वेळी घराणेशाहीच्या आधारावर सत्ता देण्यास विरोध करण्यात आला होता. त्यामुळे काही लोक त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सध्या लष्करी पाठबळामुळे मोजतबा खामेनेई यांना एक प्रबळ नेते मानले जात आहे.
Web Summary : Following Ali Khamenei's death in an airstrike, his son Mojtaba has been appointed Iran's new Supreme Leader. The 86-year-old Khamenei died in a targeted attack on government sites in Tehran. Iran declared 40 days of national mourning and heightened security measures nationwide. Mojtaba, a religious figure, was a close advisor to his father.
Web Summary : हवाई हमले में अली खामेनेई की मौत के बाद, उनके बेटे मोजतबा को ईरान का नया सर्वोच्च नेता नियुक्त किया गया है। 86 वर्षीय खामेनेई की तेहरान में सरकारी ठिकानों पर लक्षित हमले में मौत हो गई। ईरान ने 40 दिनों का राष्ट्रीय शोक घोषित किया और देश भर में सुरक्षा उपाय बढ़ा दिए। मोजतबा अपने पिता के करीबी सलाहकार थे।