इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:35 IST2025-06-16T13:34:48+5:302025-06-16T13:35:09+5:30

Iran attacks US ambessy in Israel: इस्रायलशी संघर्ष सुरु असताना इराणच्या निशाण्यावर अमेरिका का? समजून घ्या

iran missile strikes tel aviv us embassy building damaged israel war | इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

Iran attacks US ambessy in Israel: इस्रायलमधील तेल अवीव येथील अमेरिकन दूतावासावर इराणने क्षेपणास्त्राच्या सहाय्याने हल्ला केला आहे. दूतावासावरील या हल्ल्यात इमारतीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही जीवितहानीते वृत्त नाही. अमेरिका सरकार इस्रायल आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न करत आहे. त्याच वेळी अशा प्रकारचा हल्ला झाल्याने यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

दूतावास दिवसभरासाठी बंद

वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, इराण इस्रायलवर सतत क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. त्यातच आता इराणी क्षेपणास्त्राने अमेरिकन दूतावासावर हल्ला केला. अमेरिकेचे राजदूत माइक हकाबी यांच्या मते, या हल्ल्यात अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. परंतु, कोणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडलेले नाही. खबरदारी म्हणून तेल अवीवमधील वाणिज्य दूतावास आणि जेरुसलेममधील दूतावास संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

इराणच्या निशाण्यावर अमेरिका का?

इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांमागे अमेरिकेचा हात असल्याचा इराणला विश्वास आहे. अमेरिकेने हे आरोप मान्य केलेले नाहीत. पण इस्रायलने केलेला हल्ला अमेरिकाच्या सांगण्यावरूनच झाल्याचा इराणचा दावा आहे. इस्रायलकडे जी शस्त्रास्त्रे आहेत, ती अमेरिकेने दिलेली आहेत. इस्रायल अमेरिकन एफ-३५ लढाऊ विमानांद्वारे इराणवर हल्ला करत आहे. तसेच इराण अमेरिकेवर हल्ला करून युद्धाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जर अमेरिकेने युद्धात थेट उडी घेतली, तर इराणला रशिया आणि चीनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे मिळू शकतात.

अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये भिती

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या क्षेपणास्त्र युद्धामुळे अमेरिकन अधिकारी घाबरले आहेत. ३ दिवसांपूर्वी इराणने तेल अवीववर हल्ला केला, तेव्हा इस्रायलमधील अमेरिकन राजदूत हुकाबी यांना ५ वेळा त्यांचे स्थान बदलावे लागले. हुकाबींच्या मते, त्या रात्री ते जिथे जात होते, तिथे हल्ल्याची भीती होती. त्यामुळे त्यांना ५ वेळा बंकर बदलावे लागले.

Web Title: iran missile strikes tel aviv us embassy building damaged israel war