असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:54 IST2025-06-19T16:52:38+5:302025-06-19T16:54:25+5:30
असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अशावेळी झाली आहे जेव्हा कुठल्याही क्षणी अमेरिका इराणविरोधात हल्ला करू शकते अशी चर्चा सुरू आहे.

असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
इस्लामाबाद - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानी फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धात मुनीर यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानी सैन्याने त्यांचे एअरबेस वापरायला द्यावे असं अमेरिकेला वाटते. याआधी अफगाणिस्तानवरील हल्ल्यात पाकिस्तानने नूरखान एअरबेस अमेरिकेला वापरायला दिला होता. असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळे इराण-इस्त्रायल यांना मोठा संकेत दिल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तान आणि इस्त्रायल यांच्यात संबंध खराब नाहीत. पाकिस्तानी नेतृत्व बहुतांश लोकांची अपेक्षा इराणपेक्षा चांगले ओळखते परंतु ट्रम्प यांचे विधान पाकिस्तानी नेत्यांच्या विधानापेक्षा उलटे आहे, जे सातत्याने इस्त्रायलवर टीका करून इराणचे समर्थन करतात. मुनीर यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. जनरल मुनीर यांच्यासोबत इराणबाबत चर्चा झाली. इस्त्रायलसोबत त्यांचे वाईट आहे असं नाही. पाकिस्तानी दोघांना ओळखतात पण इराणबाबत त्यांना चांगली माहिती आहे. ते सध्या लक्ष ठेवून आहेत असं त्यांनी सांगितले. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी पाकिस्तानी सैन्याकडे इराणविरोधात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानात सैन्य प्रमुख ताकदवान असतो आणि परराष्ट्र धोरणात सैन्य प्रमुखाचे मत अखेरचे असते.
असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अशावेळी झाली आहे जेव्हा कुठल्याही क्षणी अमेरिका इराणविरोधात हल्ला करू शकते अशी चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी बऱ्याच वेळा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. परंतु मुनीर यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी संकेत दिले आहेत. इराणवर ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्याचे पाकिस्तानी सैन्यानेही मान्य केले. इराण-इस्त्रायल युद्धात मध्यस्थीची भूमिका निभावू असं पाकिस्तान सांगत आहे. त्यात इराण चर्चेला तयार असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी म्हटलं.
दरम्यान, पाकिस्तान आणि इराण यांच्या अण्वस्त्राबाबत कित्येक जुने संबंध आहेत. पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादिर खान हे इराण आणि इतर देशांना त्यांच्या अणुकार्यक्रमासाठी सेंट्रीफ्यूज पुरवत होते असा संयुक्त राष्ट्राच्या अण्वस्त्रे देखरेख संस्थेचे आरोप आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील बैठक खूप खास आहे. ही १ तासाची चाललेली बैठक अमेरिका इराणवर हल्ला करणार आहे हे दर्शवते असं तज्त्रांनी म्हटलं.
भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न
ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानी सैन्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यात ट्रम्प आणि मुनीर यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी सैन्यावर इराणविरोधात त्यांचे एअरबेस अमेरिकेला वापरण्यासाठी द्यावा असा दबाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्य याचा फायदा घेत अमेरिकेच्या माध्यमातून भारताला चर्चेसाठी आणि काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीसाठी दबाव वाढवू शकते.