इराण युद्धात अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर रशियानं मांडली थेट भूमिका; "आमच्याशिवाय कुणीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:38 IST2026-03-13T17:36:55+5:302026-03-13T17:38:56+5:30

जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील उलथापालथीनंतर अमेरिकेने घेतलेले हे पाऊल एक मोठे दिलासा देणारे पाऊल मानले जात आहे.

Iran Isreal US War: US decision effectively recognised the importance of Russian oil supplies to global markets - Russia's economic envoy Kirill Dmitriev | इराण युद्धात अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर रशियानं मांडली थेट भूमिका; "आमच्याशिवाय कुणीही..."

इराण युद्धात अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर रशियानं मांडली थेट भूमिका; "आमच्याशिवाय कुणीही..."

इराणसोबत वाढते युद्ध आणि जगभरात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटात रशियाने अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. समुद्रात अडकलेल्या रशियाच्या तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाच्या खरेदीवरील निर्बंध अमेरिकेने हटवण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या तेलाशिवाय जागतिक ऊर्जा बाजार स्थिर करणे शक्य नाही असं रशियाने स्पष्ट शब्दात सांगितले.

रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह  यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जगात सध्या अनेक देशांना ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत रशियाच्या तेल साठ्याशिवाय बाजार स्थिर करणे अशक्य आहे. रशियन तेलाच्या मोठ्या प्रमाणात उपलब्धतेशिवाय बाजारपेठ स्थिर करणे शक्य नाही. अमेरिका ऊर्जा बाजारपेठ स्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपण पाहत आहोत आणि त्यात आमचे हितही जोडलेले आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच इराण संकटामुळे युक्रेन शांतता चर्चेत अमेरिकेचा रस कमी होईल असे आम्हाला वाटत नाही असं रशियाचे म्हणणे आहे. सध्या रशियाला अशी कोणतीही चिंता नाही की इराण संकटामुळे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अमेरिकेची जास्त रस घेणार नाही असंही प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले. रशियाचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकन प्रशासनाने समुद्रात अडकलेल्या रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी देशांना विशेष ३० दिवसांचा परवाना जारी केला आहे.

जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील उलथापालथीनंतर अमेरिकेने घेतलेले हे पाऊल एक मोठे दिलासा देणारे पाऊल मानले जात आहे. जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर करण्यासाठी आणि तेलाच्या किमतींमध्ये अचानक वाढ नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत पोहचल्या आहेत. जो जवळजवळ चार वर्षातील सर्वोच्च दर आहे. या तात्पुरत्या परवानगीमुळे रशियन सरकारला कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होणार नाही असं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले आणि त्यानंतर इराणनं दिलेल्या प्रत्युत्तरामुळे मध्य पूर्वेतील तणावात आणखी वाढ झाली. या तणावाचा थेट परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी व्यापारावर झाला आहे, जो जगाच्या तेल आणि वायू पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो.

Web Title : ईरान पर अमेरिकी फैसले पर रूस की प्रतिक्रिया: 'हमारे बिना कोई नहीं...'

Web Summary : रूस ने अपने तेल पर प्रतिबंधों को आसान बनाने के अमेरिकी फैसले का स्वागत किया। रूस ने कहा कि उसके तेल भंडार के बिना वैश्विक ऊर्जा बाजार का स्थिरीकरण असंभव है। रूस को ईरान तनाव से यूक्रेन शांति वार्ता में अमेरिकी दिलचस्पी पर असर पड़ने की आशंका नहीं है।

Web Title : Russia Reacts to US Iran Decision: 'Nobody Without Us...'

Web Summary : Russia welcomed the US decision to ease restrictions on its oil. Russia stated global energy market stabilization is impossible without its oil reserves. Russia doesn't foresee Iran tensions impacting US interest in Ukraine peace talks.