तेहरान - अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणने शेजारील राष्ट्रांवरही हल्ले केले होते. परंतु आता शेजारील राष्ट्रांवर हल्ले करणार नाही असं इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे परंतु त्यासाठी एक अटही ठेवली आहे. जोवर शेजारील राष्ट्रांच्या भूमीचा वापर आमच्यावरील हल्ल्यासाठी केला जात नाही तोपर्यंत आम्हीही या राष्ट्रांवर हल्ला करणार नाही. इराणच्या अंतरिम लीडरशीप कौन्सिलने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्या हवाल्याने इराणी माध्यमांनी बातमी दिली आहे. त्यानुसार, राष्ट्रपतींनी मागील काही दिवसांपासून शेजारील राष्ट्रांवर केलेल्या हल्ल्याची माफीही मागितली आहे. इराणच्या राष्ट्रपतींच्या घोषणेनंतर कतारमधील लोकांच्या मोबाईलवर एक मेसेजही पाठवण्यात आला आहे. त्यात आता सुरक्षेचा धोका संपुष्टात आला आहे. परिस्थिती सामान्य झाली आहे असं त्यात म्हटलं आहे. सौदी अरेबिया आणि यूएईने इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती त्यावेळी इराणने शेजारील राष्ट्रांवर हल्ले रोखण्याची घोषणा केली आहे.
तर इराणी राष्ट्रपतींनी माफी मागीतल्यानंतरही कतारची राजधानी दोहा येथे स्फोटाचा आवाज ऐकायला आल्याची बातमी अलजजीरा वृत्तसंस्थेने दिली. क्षेपणास्त्रे जमिनीवर पडण्याआधी त्याला पाडण्यात यश आले असं बातमीत म्हटलं. इराणी राष्ट्रपतींनी शेजारील राष्ट्रांवर हल्ला करणार नाही म्हटल्यानंतरही हा हल्ला झाला. दोहा येथे सुरक्षेसाठी सायरन वाजवण्यात आले. सध्या इराणमधील वरिष्ठांकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे जमिनीवरील सैन्याला माहिती करून दिली आहे की नाही याची स्पष्टता नाही. कतारच्या संरक्षण मंत्रालयानेही इराणी मिसाइल हल्ल्याची पुष्टी केली आहे.
दरम्यान, इराणी सैन्यदलाने आमच्या देशाला लक्ष्य करून केलेला क्षेपणास्त्र हल्ला आम्ही रोखला आहे असं कतारच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. परंतु किती क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अझरबैजान एकत्रितपणे इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यातच इराणकडून ही घोषणा करण्यात आल्याने आता या तिन्ही देशांची भूमिका काय असेल हे लवकरच समोर येईल.
Web Summary : Iran halts attacks if neighbors don't aid aggression. President apologizes, Qatar reports missile intercept despite the promise. Tensions still high.
Web Summary : ईरान ने हमले रोके यदि पड़ोसी आक्रमण में मदद न करें। राष्ट्रपति ने माफी मांगी, कतर ने मिसाइल रोके जाने की सूचना दी। तनाव अभी भी ज़्यादा है।