अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची उडी; मध्यस्थीची दर्शवली तयारी, इस्लामाबादमध्ये बैठक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:43 IST2026-03-24T18:43:34+5:302026-03-24T18:43:43+5:30

Iran Isreal US War: प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग असल्याचे पाकिस्तानने म्हटले.

Iran Isreal US War: Pakistan's jump into US-Iran conflict; Ready to mediate, meeting in Islamabad? | अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची उडी; मध्यस्थीची दर्शवली तयारी, इस्लामाबादमध्ये बैठक?

अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची उडी; मध्यस्थीची दर्शवली तयारी, इस्लामाबादमध्ये बैठक?


Iran Isreal US War: पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी संवाद आणि कूटनीती हा एकमेव मार्ग आहे. जर इराण आणि इस्रायल तयार असतील तर इस्लामाबाद चर्चेचे आयोजन करण्यास तयार आहे. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ले न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचा दावा केला. मात्र इराणने हा दावा फेटाळून लावला आहे.

राजनैतिक हालचालींच्या केंद्रस्थानी पाकिस्तान

अहवालानुसार, पाकिस्तान या संपूर्ण राजनैतिक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. याच दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसाक दार यांनी इराण आणि तुर्कियेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा केली. काही आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, इस्लामाबादमध्ये अमेरिकन आणि इरानी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याबाबत संपर्क प्रक्रिया सुरू आहे.

इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा केला असला तरी, इराणने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. इराणने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच खोट्या बातम्या पसरवून तेल आणि आर्थिक बाजारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही ईरानने केला.

Web Title : अमेरिका-ईरान संघर्ष में पाकिस्तान की मध्यस्थता पेशकश; इस्लामाबाद में बैठक?

Web Summary : पाकिस्तान ने अमेरिका-ईरान संघर्ष में मध्यस्थता की पेशकश की है, इस्लामाबाद में वार्ता का प्रस्ताव रखा है। अमेरिका वार्ता में प्रगति का दावा करता है, लेकिन ईरान इनकार करता है। पाकिस्तान के राजनयिक प्रयास तेज।

Web Title : Pakistan Offers to Mediate US-Iran Conflict; Islamabad Meeting Possible?

Web Summary : Pakistan offers mediation in the escalating US-Iran conflict, proposing Islamabad as a venue for talks. While the US claims progress in discussions, Iran denies any such dialogue. Pakistan's diplomatic efforts are intensifying.