शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशांची माफी मागून इराणी राष्ट्रपती एकटे पडले, देशात विद्रोह; सैन्यानं उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 08:17 IST

पेझश्कियान यांच्या माफीने इराणमध्ये राजकीय खळबळ माजली आहे. ज्यातून त्यांच्या कार्यालयाला पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागले.

तेहरान - मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षात इराणी राष्ट्रपतींनी माफी मागितल्याने इराणमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्या माफीने सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडली आहे. आखाती देशांवर केलेल्या हल्ल्याबद्दल राष्ट्रपती यांनी माफी मागितली होती. त्यासोबत यापुढे हल्ला करणार नाही असा शब्दही त्यांनी दिल्याने इराणमधील कट्टरपंथी नाराज झाले आहेत. त्यामुळेच पेझेक्शियान यांनी विश्वास दिल्यानंतरही आखाती देशांवर सैन्याने हल्ला सुरू ठेवला आहे.

इराणी राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं होते की, मी वैयक्तिक त्या शेजारील देशांची माफी मागतो जे इराणी हल्ल्यामुळे प्रभावित झाले आहेत. या देशांनी इस्रायल आणि अमेरिका यांची युद्धात मदत करू नये असं माझे आवाहन आहे असं त्यांनी सांगितले होते. पेझेश्कियान यांनी ट्रम्प यांचा विना अट आत्मसमर्पण करण्याची प्रस्ताव फेटाळून लावला. इराणच्या अस्थायी नेतृत्व परिषदेने शेजारील राष्ट्रांवरील हल्ले रोखण्यावर सहमती दर्शवली आहे. जोपर्यंत या देशांच्या भूमीवरून इराणवर हल्ले होणार नाहीत तोपर्यंत इराणही हल्ला करणार नाही असं त्यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी या माफीला आत्मसमर्पण असल्याचा दावा केला. 

इराणी राष्ट्रपतींच्या माफीनं वरिष्ठ कमांडर्स नाराज

पेझश्कियान यांच्या माफीने इराणमध्ये राजकीय खळबळ माजली आहे. ज्यातून त्यांच्या कार्यालयाला हे स्पष्टीकरण द्यावे लागले की इराणी सैन्य अमेरिकन ठिकाणांवरून होणाऱ्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल. काही तासांनी राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर त्यांचे विधान पुन्हा पोस्ट केले. परंतु यावेळी त्यांनी माफी हा शब्द हटवला. कट्टरपंथी धर्मगुरू आणि खासदार हामिद रसोई यांनी पेझेश्कियान तुमची भूमिका अव्यावसायिक, कमकुवत आणि अस्वीकार्य होती अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय न्यायपालिकेचे प्रमुख मोहसेनी एजेई, जे सर्वोच्च नेत्याचे अधिकार तात्पुरते सांभाळणाऱ्या ३ सदस्यीय परिषदेतील एक सदस्य आहेत. त्यांनीही पेझेश्कियान यांच्या विधानावर आक्षेप घेतला. काही प्रादेशिक देशांमधील जागेचा वापर उघडपणे आणि गुप्तपणे इराणविरोधात हल्ला करण्यासाठी केला जात आहे. तिथे हल्ले जारी राहतील असं त्यांनी इशारा दिला.

दरम्यान, इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डसनेही त्यांची प्रतिक्रिया दिली. आमच्या ड्रोनने संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबू धाबीजवळील अल धाफरा एअर बेसवर अमेरिकन एअर कमांड सेंटरवर हल्ला केला. दुबईमध्येही हल्ला झाला त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. बहरीन आणि दोहामध्येही हल्ले करण्यात आलेत असं त्यांनी स्पष्टीकरण दिले. पेझेश्कियान यांच्या माफीमुळे रिवोल्यूशनरी गार्डसचे अनेक सीनियर कमांडर नाराज झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iranian President's Apology Divides Nation, Military Action Continues

Web Summary : Iranian President's apology to Gulf states sparks internal conflict. Military continues attacks despite his peace overtures, defying calls for de-escalation. Senior commanders are reportedly unhappy.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीsaudi arabiaसौदी अरेबिया