शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 1:37 PM

इराणने 13 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 300 पेक्षा जास्त हल्ले केले.

Iran-Israel :इराण आणि इस्रायल, यांच्यात सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र झाले आहे. याचे कारण म्हणजे, इराणने 13 एप्रिलच्या मध्यरात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 300 पेक्षा जास्त हल्ले केले. या घटनेमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधी इराणने एक इस्रायली मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजावर एकूण 25 कर्मचारी असून, त्यापैकी 17 भारतीय आहेत. आता या हल्ल्यांमुळे त्या 17 भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न भारतासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे MSC Aries, हे इस्रायली जहाज ताब्यात घेतले आहे. हे जहाज लंडनस्थित झोडियाक मेरीटाईमचे आहे, जे इस्रायली अब्जाधीश आयल ऑफरच्या झोडियाक ग्रुपशी संबंधित आहे. हे जहाज संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील बंदरातून निघाले होते. इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोर आपल्या 17 नागरिकांना वाचवण्याचे मोठे आवाहन आहे. 

भारताने अधिकृतपणे इराण आणि इस्रायल, यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवर निवेदन जारी केले आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आम्ही चिंतेत आहोत. दरम्यान, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांची लवकर सुटका करण्यासाठी भारत सरकार राजनयिक माध्यमांद्वारे इराण सरकारच्या संपर्कात आहे. या दोन देशांमधील संघर्ष वाढल्यास भारतासमोर निश्चितच आव्हान निर्माण होईल. भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी भारत परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIranइराणIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदी