शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:53 IST

Iran-Israel War: इराणी तेलावर डोळा ठेवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन काय आहे?

Iran-Israel War: अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेले इराण-इस्रायलयुद्ध शांत झाले. दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणबद्दलचा कट्टर दृष्टिकोन बदललेला दिसतोय. ते वारंवार इराणमध्ये उपलब्ध असलेल्या तेलाबद्दल बोलत आहेत. पाश्चात्य देशांची संरक्षण संघटना नाटोच्या पत्रकार परिषदेत इराणी तेलावरील निर्बंध शिथिल करण्याच्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, 'युद्धानंतर आता इराणला पैशांची आवश्यकता आहे.' ट्रम्प यांच्या टिप्पणीचा थेट अर्थ असा होता की, ते इराणी तेलावरील निर्बंध शिथिल करण्यास तयार आहेत.

ट्रम्प यांचे इराण तेलावर भाष्य पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, 'इराण नुकताच युद्धातून बाहेर पडला आहे. त्यांनी युद्ध खूप धैर्याने लढले. ते तेलाचा व्यवसाय करतात. मला हवे असेल तर मी त्यांना हे करण्यापासून रोखू शकतो आणि स्वतः चीनला तेल विकू शकतो, पण मला हे करायचे नाही. देशाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. त्यांना तेल विकायचे असेल तर ते ते विकतील. आम्ही तेल जप्त किंवा निर्बंध लादणार नाही,' असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले. 

इराणी तेलावर ट्रम्प यांचा डोळाविशेष म्हणजे, दोन्ही देशांमधील युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी तेलाचा उल्लेख करत म्हटले होते की, इराणकडे भरपूर तेल आहे. ट्रम्प यांनी तीन दिवसांत तीन वेळा इराणी तेलाचा उल्लेख केला, ज्यावरून स्पष्ट होते की, इराणबाबत त्यांच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला आहे. या बदलामागील मुख्य कारण म्हणजे इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि होर्मुझची मार्ग बंद होण्याची भीती. इराणी तेलावर निर्बंध असले तरी, त्याचे तेल अप्रत्यक्षपणे बाजारात पोहोचते, ज्यामुळे तेलाचे दर स्थिर राहिले. परंतु इराण-इस्रायल युद्ध सुरू होताच, तेलाच्या किमती अचानक वाढल्या. वाढत्या तेलाच्या किमतींमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना त्रास झाला.

तेल खरेदीला अमेरिकेचा हिरवा कंदील इराण-इस्रायल युद्धापूर्वी ट्रम्प कोणत्याही देशाला बंदी घातलेले इराणी तेल खरेदी करण्यास कडक विरोध करत होते. असे असूनही, चीन अप्रत्यक्ष मार्गाने गुप्तपणे इराणी तेल खरेदी करायचा, अजूनही करतो. चीन इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. इराणी तेलावरील नेहमीच विरोध करत आला आहे. ट्रम्प यांनी इराणी तेल खरेदी केल्याबद्दल अनेक स्वतंत्र तेल शुद्धीकरण कंपन्या आणि चीनच्या पोर्ट टर्मिनल ऑपरेटरवरही निर्बंध लादले होते. परंतु मंगळवारी, नाटो शिखर परिषदेला जाताना ट्रम्प म्हणाले की, चीन इराणकडून तेल खरेदी करू शकतो. 

ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, चीन आता इराणकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवू शकतो. आशा आहे की, ते (चीन) अमेरिकेकडूनही भरपूर तेल खरेदी करतील. ट्रम्प यांच्या विधानावर व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की, ट्रम्प हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की, इराणने अद्याप होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. असे झाले असते, तर चीनला फटका बसला असता. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेल