Iran USA War Death Count: अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्धाचा भडका उडाला आहे. मागील चार दिवसांपासून दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले केले जात असून, इराणमध्ये चार दिवसांत १ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकेतील ह्युमन राइट्स एक्टिविस्ट्स न्यूज एजन्सीने म्हटले आहे. यात मृतांपैकी १८१ जण हे १० वर्षाच्या आतील मुले आहेत. या युद्धात इस्रायल, अमेरिका आणि इराण शेजारील देशांतही अनेकांचा मृत्यू झाला आहे.
ह्युमन राइट्स एक्टिविस्ट्स न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत इराणध्ये १०९७ लोकांचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट आहे. मृतांमध्ये मुलांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर युद्धामुळे जखमी झालेल्यांचीही संख्याही ५,४०२ इतकी आहे. यात १०० मुले जखमी आहेत.
२४ तासांत १०४ पेक्षा जास्त हवाई हल्ले
एचआरएएनएने म्हटले आहे की, मागील २४ तासांमध्ये कमीत कमी १०४ पेक्षा जास्त हवाई हल्ले केले गेल्याची नोंद झाली आहे. हे हल्ले लष्करी ठिकाणांबरोबरच रुग्णालये आणि रहिवाशी भागातही करण्यात आले आहेत. शेकडो नागरिकांच्या मृत्यूचा अजूनही तपास केला जात आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.
१६५ शाळेकरी मुलींचा मृत्यू
अमेरिकेने एका शाळेवर मिसाईल हल्ला केला. यात १६५ मुलींचा मृत्यू झाला. मिनाबमध्ये युद्धाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली होती. इराणीयन रेड क्रिसेंट सोसायटीने हा आकडा जाहीर केला आहे.
इस्रायलमध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात बेतशेमेशजवळ इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यातील मृतांची संख्या ९ आहे. १ मार्च रोजी इराणने जेरुसलेमजवळ हा हल्ला केला होता.
इस्रायलकडून लेबनानमध्येही हवाई हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये लेबनानमध्ये ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
बहरीनमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, मिसाईल रोखण्यात येत असतानाच बहरीनमधील सलमान औद्योगिक शहरात आग लागली. त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कुवैतमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन कुवैत जवानांचा समावेश आहे. कुवैतच्या आरोग्य आणि गृह मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
ओमानमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. इराणने कुवैतमधील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणावर हल्ला केला. त्यात अमेरिकेचे सहा जवान मेले आहेत.
Web Summary : Iran-Israel conflict escalates, resulting in over a thousand deaths in Iran alone, including many children. Casualties reported in Israel, Lebanon, Kuwait, Oman, UAE and Bahrain after missile strikes and retaliatory attacks. The conflict also caused American military deaths in Kuwait. Schools and hospitals were also targeted.
Web Summary : ईरान-इज़राइल संघर्ष में तेज़ी, अकेले ईरान में बच्चों सहित एक हजार से अधिक मौतें। मिसाइल हमलों और जवाबी हमलों के बाद इज़राइल, लेबनान, कुवैत, ओमान, यूएई और बहरीन में हताहतों की सूचना। कुवैत में अमेरिकी सैन्य मौतें भी हुईं। स्कूल और अस्पताल भी निशाने पर थे।