कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:03 IST2025-06-16T18:02:30+5:302025-06-16T18:03:13+5:30

Iran Israel War: हमास शेजारी असूनही भेदू न शकलेली इस्रायलची एअर डिफेन्स यंत्रणा इराणने भेदली असून इस्रायलवरही क्षेपणास्त्रे पडू लागली आहेत. एवढेच नाहीतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या बेडरूमवरही इराणने क्षेपणास्त्र डागले होते.

Iran Israel War: Crude oil likely to reach $300; Iraqi minister said to Germany what can Iran Do if war started | कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

इस्रायल आणि इराणमधील युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलने हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊ लागली आहे. पुन्हा हे दर कोरोना काळातील किंमती टच करण्याची शक्यता आहे. परंतू, जर सैन्य कारवाईपर्यंत युद्धाची व्याप्ती वाढली तर हेच दर प्रति बॅरल ३०० डॉलरवर जाण्याचा इशारा इराकच्या मंत्र्यांनी दिला आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना इराकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फोनवरून पुढील धोक्याची कल्पना दिली आहे. 

इराणने होर्मुझची खाडी बंद केली तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते, असा इशारा इराकचे मंत्री फुआद हुसेन यांनी म्हटले आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल ३०० डॉलर्सपर्यंत वाढू शकतात, असे ते म्हणाले आहेत. जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. 

गुरुवारी रात्री इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले चढविले. यात अण्वस्त्र संशोधन केंद्रांसह अण्वस्त्र बनिविणाऱ्या शास्त्रज्ञांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले होते. यात जवळपास १० शास्त्रज्ञ मारले गेले होते. इराणने इस्रायलला जोरदार प्रत्यूत्तर देण्यास सुरुवात केली आहे. हमास शेजारी असूनही भेदू न शकलेली इस्रायलची एअर डिफेन्स यंत्रणा इराणने भेदली असून इस्रायलवरही क्षेपणास्त्रे पडू लागली आहेत. एवढेच नाहीतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या बेडरूमवरही इराणने क्षेपणास्त्र डागले होते. नेतन्याहू अज्ञात स्थळी गेले असल्याने ते वाचले आहेत. परंतू, यामुळे युद्ध आणखी भडकणार आहे. 

परंतू, यामुळे जगाची धाकधूक वाढू लागली आहे. लष्करी कारवाई सुरू झाली तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल २०० ते ३०० डॉलर्सने वाढू शकतात. युरोपीय देशांमध्ये महागाई दरात मोठी वाढ होईल आणि इराकसारख्या तेल निर्यातदार देशांना तेल पुरवठा करणे कठीण होईल, असे इराकी मंत्र्यांनी म्हटले आहे. इराणने जर होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली तर दररोज सुमारे ५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची घट होऊ शकते कारण इराकला पुरवठा करणे शक्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Iran Israel War: Crude oil likely to reach $300; Iraqi minister said to Germany what can Iran Do if war started