शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:44 IST

Iran Israel Ceasefire latest Attack: इराणने कतारमधील अमेरिकेच्या मोठ्या एअरबेसवर हल्ला चढविला. यानंतर लगेचच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायल-इराणमध्ये सीझफायर केल्याची घोषणा केली.

इराणवर अमेरिकेने तीन दिवसांपूर्वी हल्ला चढविला होता. यामुळे भडकलेल्या इराणने अमेरिकेला धडा शिकविण्याची धमकी दिली होती. यानुसार आज मध्यरात्री इराणने कतारमधील अमेरिकेच्या मोठ्या एअरबेसवर हल्ला चढविला. यानंतर लगेचच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायल-इराणमध्ये सीझफायर केल्याची घोषणा केली. परंतू, ती आता त्यांच्याच अंगलट आली आहे. इराणने ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच इस्रायलवर जोरदार मिसाईल हल्ला चढविला आहे. यात तीन इस्रायली नागरिक मारले गेले आहेत. 

इराणनुसार इस्रायलने आपल्यावर पहिले हल्ले केले आहेत. आपण कोणताही हल्ला केला नव्हता, तसेच कोणाला उकसवले देखील नव्हते. यानंतर अमेरिकेनेही आपला विश्वासघात केल्याचे आरोप इराणने केले होते. आता इस्रायलला नडणारा देश अखेर भेटला आहे. यामुळे अमेरिकेने आपले नुकसान होऊ नये या उद्देशाने एकाबाजुनेच सीझफायर केल्याची घाईघाईने घोषणा केली आहे. परंतू, इराण काही थांबताना दिसत नाहीय. 

अमेरिका, इस्रायलला वाटेल तेव्हा हल्ले आणि वाटेल तेव्हा सीझफायर हा प्रकार चालणार नाही, हेच इराणने ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इस्रायलवर हल्ला करून एकप्रकारे दाखवून दिले आहे. इराणने केलेल्या ताज्या हल्ल्यात येरुशलेम आणि तेल अवीवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. तसेच इराणच्या मिसाईलने बीरशेबा इमारतीवरही हल्ले केले आहेत. यात कमीतकमी तीन इस्रायली नागरिक मारले गेले आहेत, तर अनेक जखमी आहेत. 

इस्रायली सैन्याने आपल्या जनतेला इशारा दिला की इराणने त्यांच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली आहेत, तर प्रस्तावित युद्धबंदी अद्यापही अनिश्चित आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजता ही मिसाईल डागण्यात आली आहेत. सहा बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात आली आहेत. 

ट्रम्प यांना कशाची घाई...नोबेलवर दावा सांगणाऱ्या ट्रम्प यांनी दुसऱ्याच दिवशी इराणवर हल्ले चढविले होते, यामुळे जगभरात त्यांची नाचक्की झाली होती. त्यातच इराणने आपला मोर्चा कतारमधील अमेरिकी एअरबेसवर वळविल्याने आता अमेरिकेचे नुकसान होणार हे पाहून ट्रम्पनी भारत-पाकिस्तान युद्धासारखीच शेखी मिरविली आहे. इस्रायल आणि इराण एकाच वेळी माझ्याकडे आले आणि शांतता प्रस्थापित करूया असे म्हणाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका