शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:56 IST

Iran-Israel War : अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर जगातील बहुतेक देशांनी राजनैतिक तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे.

Iran-Israel War :इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. आज पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आता यावर जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ब्रिटनने इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यांचे समर्थन करताना म्हटले की, आता इराणने वाटाघाटीच्या टेबलावर यावे. तर, सौदी अरेबियाने म्हटले की अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणमध्ये किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नाही. सौदीने राजनैतिक चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा सल्ला दिला.

न्यूझीलंडने केले चर्चेचे आवाहन न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी रविवारी या संघर्षावर प्रतिक्रिया देताना शांततेत चर्चा करण्याचे आवाहन केले. मात्र, न्यूझीलंडच्या प्रमुखांचे ट्रम्प यांच्या कृतीला पाठिंबा आहे की नाही, हे त्यांनी पत्रकारांना सांगितले नाही. 

ओमानने केला हल्ल्याचा निषेध ओमानने इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्याचा उघडपणे निषेध केला आहे. दरम्यान, इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या अणु चर्चेत ओमान मध्यस्थीची भूमिका बजावत होता. आता ओमानने हा हल्ला चुकीचा असल्याचे सांगत तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.

चीनची प्रतिक्रिया इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यावर चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला की, अमेरिकेने इराकमध्ये जी चूक केली, तीच चूक इराणमध्ये पुन्हा करत आहे का. अमेरिकेचे हल्ले धोकादायक वळण दर्शवतात. २००३ मध्ये इराकवरील अमेरिकेच्या आक्रमणाचा उल्लेख करून लेखात म्हटले की, इतिहासाने वारंवार दाखवले आहे की, पश्चिम आशियातील लष्करी हस्तक्षेपाचे अनेकदा अनपेक्षित परिणाम होतात, ज्यात दीर्घकाळ संघर्ष आणि सतत प्रादेशिक अस्थिरतेचा समावेश आहे.

जपान आणि दक्षिण कोरिया बैठक घेणारजपानच्या एनएचके टेलिव्हिजननुसार, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा रविवारी दुपारी इराणी अणु केंद्रांवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले की, ते रविवारी अमेरिकेच्या हल्ल्यांचे सुरक्षा आणि आर्थिक परिणाम आणि दक्षिण कोरियाच्या संभाव्य प्रतिसादावर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक घेणार आहेत.

राजनैतिक तोडगा काढण्याची ऑस्ट्रेलियाची मागणी

या संपूर्ण मुद्द्यावर, ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इस्रायल-इराण संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्याचा पुरस्कार केला आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने लेखी निवेदनात म्हटले की, आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, इराणचा अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका आहे. आम्ही अमेरिकेच्या कृतीला पाठिंबा देतो, पण आता शांततेची वेळ आली आहे. या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. आम्ही पुन्हा एकदा तणाव कमी करण्याचे, संवादाचे आणि राजनयिकतेचे आवाहन करतो.

अमेरिकेचा इराणवर हल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले होते की, इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेतील. मात्र, त्यानंतर लगेच अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या 3 महत्त्वाच्या अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणचे किती नुकसान झाले, आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता इराणच्या अणु केंद्रांवर अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यांबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली आहे. गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. याचा नागरिकांसाठी, प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतो. मी देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन करतो. यावर कोणताही लष्करी उपाय नाही. फक्त राजनैतिक कूटनीतिच उपाय शोधू शकते. 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धJapanजपानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प