रियाध/वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील युद्ध आता एका अशा वळणावर पोहोचले आहे, जिथून परतीचा मार्ग कठीण दिसत आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर भीषण ड्रोन हल्ला झाला असून, यामुळे दूतावासाच्या परिसरात मोठी आग लागली आहे. या घटनेनंतर अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने अत्यंत कडक 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' जारी करत, मध्य-पूर्वेतील सर्व अमेरिकन नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे.
रियाधमधील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकन दूतावासाला इराण समर्थित गटाने ड्रोनद्वारे लक्ष्य केले. या हल्ल्यात दूतावासाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून परिसरात आगीचे लोट दिसत आहेत. अद्याप जीवितहानीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अमेरिकेचा 'इव्हॅक्युएशन' आदेशपरिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अमेरिकेने आखाती देशांत राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थानी हलवण्याचे किंवा तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. "सध्याची परिस्थिती अत्यंत अस्थिर असून कोणत्याही क्षणी मोठा लष्करी संघर्ष होऊ शकतो," असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
विमानतळांवर एकच गर्दीअमेरिकेच्या या आदेशानंतर दुबई, अबु धाबी आणि रियाध विमानतळांवर पाश्चात्य नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
इराणचा आक्रमक पवित्राइराणने आधीच 'होर्मुझ सामुद्रधुनी' बंद केली असून, आता अमेरिकन लष्करी आणि राजनैतिक ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने या हल्ल्याचा बदला म्हणून इराणच्या मुख्य तळांवर 'कार्पेट बॉम्बिंग' करण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
Web Summary : A drone attack targeted the US embassy in Riyadh, causing a fire. The US State Department issued a travel advisory, urging citizens in the Middle East to evacuate immediately. Iran's aggressive stance and potential for military conflict are escalating tensions, leading to airport chaos and heightened security concerns.
Web Summary : रियाद में अमेरिकी दूतावास पर ड्रोन से हमला हुआ, जिससे आग लग गई। अमेरिकी विदेश विभाग ने यात्रा परामर्श जारी किया, जिसमें मध्य पूर्व में नागरिकों को तुरंत निकालने का आग्रह किया गया। ईरान के आक्रामक रुख और सैन्य संघर्ष की आशंका से तनाव बढ़ रहा है, जिससे हवाई अड्डों पर अराजकता और सुरक्षा चिंताएं बढ़ रही हैं।