पुन्हा अशी घटना घडली तर..; लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान रशियन पत्रकारावर हवाई हल्ला, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:59 IST2026-03-20T18:57:13+5:302026-03-20T18:59:27+5:30

Iran-Israel-US: या प्रकरणी रशियाने इस्रायला सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Iran-Israel-US: If such an incident happens again..; Airstrike on Russian journalist during live reporting, watch video | पुन्हा अशी घटना घडली तर..; लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान रशियन पत्रकारावर हवाई हल्ला, पाहा Video

पुन्हा अशी घटना घडली तर..; लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान रशियन पत्रकारावर हवाई हल्ला, पाहा Video

Iran-Israel-US: मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान, लेबनॉनमध्ये रिपोर्टिंगद करताना रशियन मीडिया नेटवर्क RT च्या पत्रकारावर झालेल्या मिसाईल हल्ल्यामुळे रशिया संतप्त झाला आहे. या प्रकरणी रशियानेइस्रायलचे राजदूत ओडेड जोसेफ यांना समन्स पाठवून तीव्र निषेध नोंदवला असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान हवाई हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, RT चे पत्रकार स्टीव स्वीनी गुरुवारी लेबनॉनमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना इस्रायली वायुसेनेने हवाई हल्ला केला. एका लष्करी तळाजवळील पुल ओलांडत असताना पत्रकाराच्या वाहनावर रॉकेट डागण्यात आले. स्वीनी यांनी वेळीच धोका ओळखून स्वतःला वाचवले, मात्र या हल्ल्यात ते आणि त्यांचे कॅमेरामन अली रेइडा जखमी झाले.

‘जाणूनबुजून हल्ला’चा आरोप

कॅमेरामन अली रेइडा यांनी दावा केला की, पत्रकारांनी स्पष्टपणे ‘प्रेस’ अशी ओळख दर्शवणारी जॅकेट परिधान केले होते, मात्र त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

रशियाचा तीव्र निषेध

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले की, पत्रकारांवर असा हल्ला हा केवळ अपघात म्हणून मान्य करता येणार नाही. गाझामध्ये आधीच अनेक पत्रकारांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

इस्रायलची प्रतिक्रिया

दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाच्या (IDF) आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. नेमके काय घडले, याचा तपास केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title : लाइव रिपोर्टिंग के दौरान लेबनान में रूसी पत्रकार घायल; इजराइल तलब।

Web Summary : लाइव रिपोर्टिंग के दौरान लेबनान में एक रूसी पत्रकार कथित इजरायली हवाई हमले में घायल हो गया। रूस ने इजरायली राजदूत को तलब कर घटना की गहन जांच की मांग की और प्रेस पर जानबूझकर हमला करने का दावा किया।

Web Title : Russian journalist injured in Lebanon during live report; Israel summoned.

Web Summary : A Russian journalist was injured in Lebanon during live reporting due to an alleged Israeli airstrike. Russia summoned the Israeli ambassador demanding a thorough investigation into the incident, claiming a deliberate attack on the press.