शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण

By संतोष कनमुसे | Updated: June 15, 2025 14:36 IST

Iran-Israel Conflict: मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत आहे. इस्रायलने तेहरानवर हल्ला केला, इराणने तेल अवीवलाही लक्ष्य केले. दोन्ही देशांमध्ये युद्धाची भीती आहे.

Iran-Israel Conflict:  मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव सुरू झाला आहे. मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे. शुक्रवारी इस्रायलनेइराणची राजधानी तेहरान आणि त्यांच्या आसपासच्या भागात हल्ला केला. इराणनेही प्रत्युत्तर देत तेल अवीव आणि जेरुसलेमवर हल्ला केला. इराण आणि इस्रायलही मागे हटण्यास तयार नाहीत. यामुळे दोन्ही देशात युद्ध होऊ शकते.

जर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले तर कोण कोणावर भारी पडेल? या चर्चा सुरू आहेत. इस्रायल आणि इराणच्या सैन्यात सर्वात शक्तिशाली कोणता देश आहे? चला पाहूया...

"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले

दोन्ही देशांचे क्षेत्रफळ

जमीन आणि लोकसंख्येच्या बाबतीत, इराण इस्रायलपेक्षा खूप पुढे आहे. इराणचे एकूण क्षेत्रफळ १.६ मिलियन चौरस किलोमीटर (६१८,००० चौरस मैल) आहे आणि त्यांची लोकसंख्या ८८ दशलक्ष आहे.

इस्रायल हा मध्य पूर्वेतील सर्वात लहान देशांपैकी एक देश आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या इस्रायलचे एकूण क्षेत्रफळ २२,००० चौरस किलोमीटर आहे आणि इस्रायलची लोकसंख्या फक्त ९० लाख आहे.

इराणकडे सैन्यबळही जास्त

इराणकडे सशस्त्र दल, रिव्होल्यूशनरी गार्ड आणि सायबर फोर्सची मोठी टीम आहे. इराणच्या नियमित सैन्यात ६ लाख सैनिक आहेत आणि रिव्होल्यूशनरी फोर्समध्ये २ लाख सैनिक आहेत, हे वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेले आहेत. इराणी सैन्य प्रॉक्सी वॉरमध्ये देखील तज्ज्ञ आहेत, गेल्या वर्षी इस्रायल आणि अमेरिकेच्या काही कारवायांमुळे इराणच्या प्रॉक्सी वॉर फायटिंग फोर्सचे मोठे नुकसान झाले आहे.

इराणच्या टॉप कमांडकरचा मृत्यू

इराणमध्ये सशस्त्र दलांची कमतरता नाही, पण त्यांचे नेतृत्व करणारे अधिकारी आता राहिले नाहीत. शुक्रवारी इस्रायली हल्ल्यात रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल हुसेन सलामी आणि इराणचे लष्करप्रमुख जनरल मोहम्मद बघेरी हे देखील मारले गेले. याशिवाय इस्रायलने इराणच्या अणुशास्त्रज्ञांनाही मारले. यासोबतच अनेक वरिष्ठ कमांडरचाही या हल्ल्यात मृत्यू झाला .

जुन्या शस्त्रास्त्रांमुळे इराण मागे पडू शकतो

१९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीच्या वेळी अमेरिकेने इराणला काही शस्त्रे दिली होती, जी इराणकडे अजूनही आहेत. याशिवाय रशियाने इराणला अनेक लष्करी उपकरणे दिली आहेत, ज्यात एस-३०० चे नाव देखील समाविष्ट आहे. तथापि, इराणची लष्करी उपकरणे इस्रायलच्या तुलनेत बरीच जुनी आहेत. पण इराणकडे स्वतःचे शहाद हल्ला ड्रोन आहेत. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाने इराणचे शहाद ड्रोन खरेदी केले होते.

मध्य पूर्वेतील सर्वोत्तम सैन्य इस्रायलकडे 

इस्रायल हा एक लहान देश आहे, परंतु इस्रायलचे सैन्य मध्य पूर्वेतील सर्वोत्तम मानले जाते. इस्रायलचे नौदल, लष्कर आणि हवाई दल अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहेत.

इस्रायली सैन्यात लाखो सैनिक

इस्रायलकडे सुमारे १ लाख ७० हजार सक्रिय सैनिक आणि ४ लाख राखीव सैनिक आहेत. गाझा पट्टीत हमासशी दीर्घकाळ लढणारे इस्रायली सैन्य युद्धात तज्ज्ञ बनले आहे. इस्रायली हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने एकाच वेळी इस्रायलवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली आणि इस्रायली सैन्याने बहुतेक क्षेपणास्त्रे आकाशातच पाडली.

अमेरिकेची साथ

इस्रायल हा मध्य पूर्वेतील एकमेव अणुसंपन्न देश आहे. इस्रायलला अमेरिकेचाही पूर्ण पाठिंबा मिळतो. इस्रायल आणि अमेरिका नेहमीच इराणविरुद्ध एकत्र येतात. अमेरिकेने अनेक वेळा इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने अरबी समुद्रात ६० लढाऊ विमानांसह हजारो सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे.

                    इराण               जीडीपी-     ४१३.५ अरब डॉलर      

संरक्षण बजेट-९.९५ अरब डॉलर

सैन्यबळ-    ६   लाख १० हजार

सैन्य विमान- ५५१ (१८६ लढाऊ विमान)

टँक- १९९६

नौदल- ३

नौदल जहाज- १९

इस्त्रायल

  जीडीपी- ५२५ अरब डॉलर

संरक्षण बजेट- २४.४ अरब डॉलर

सैन्यबळ-   १ लाख ७० हजार

सैन्य विमान- ६१२ ( २४१ लढाऊ विमान)

टँक- १३३७०नौदल-  ५नौदल जहाज-  ४५

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध