शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:36 IST

Iran-Israel Conflcit: इस्रायल-इराण युद्धात चीनच्या एन्ट्रीने अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढली आहे.

Chinese Mystery Cargo Planes: इस्रायल-इराणयुद्धातचीनची एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसांत तीन चिनी मालवाहू विमाने इराणमध्ये पोहोचली आहेत. या विमानांचा मार्ग शांघायहून लक्झेंबर्गला होता, परंतु हवेत असतानाच या विमानांनी त्यांचे ट्रान्सपॉन्डर आणि सेन्सर बंद करुन इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, युद्धामुळे इराणची हवाई हद्द बंद होती, अशा परिस्थितीत चीनी विमानांना प्रवेश कसा मिळाला? असा प्रश्न विचारला जातोय.

'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली

दरम्यान, या विमानांमध्ये काय होते, हे अद्याप उघड झालेले नाही. अशा परिस्थितीत, चीनने इराणला शस्त्र किंवा हवाई संरक्षण प्रणाली पुरवली आहे का? असा अंदाज बांधला जातोय. इस्रायलविरुद्धच्या युद्धात चीनसोबत रशियादेखील इराणच्या बाजूने उभा असल्याचे दिसून येत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इस्रायल-इराण युद्धात उडी घेऊ नका, असा इशारा दिला आहे. पुतिन म्हणाले की, जर अमेरिका युद्धात उतरली, तर रशियादेखील थेट इराणला पाठिंबा देईल.

इराण सीमेजवळ विमाने गायब झाली FlightRadar24 मधील आकडेवारीनुसार, १४ जून २०२५ पासून चीनच्या उत्तरेकडील भागातून किमान ५ बोईंग ७४७ विमानांनी इराणच्या दिशेने उड्डाण केले आहे. या विमानांचे मार्ग साधारणपणे लक्झेंबर्ग होते, परंतु ते कधीही युरोपियन हवाई क्षेत्रात प्रवेश करताना दिसले नाही. या विमानांनी कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानची सीमा ओलांडली अन् इराणी सीमेजवळ येताच रडारवरुन गायब झाली. सर्व विमानांनी ट्रान्सपॉन्डर बंद केले होते, जे सहसा लष्करी किंवा गुप्तचर उड्डाणांचे लक्षण असते. त्यामुळेच ही विमाने शस्त्रे, युद्ध उपकरणे किंवा सुरक्षा दल घेऊन इराणला गेली होती का? असा संशय निर्माण होत आहे.

इराणला चीनचा पाठिंबा २०२१ मध्ये चीन आणि इराणमध्ये २५ वर्षांचा सामरिक सहकार्य करार झाला. त्या काळात इराणला चीनकडून ४०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळणार होती. त्या बदल्यात, चीनला सवलतीच्या दरात तेल आणि वायू पुरवठा मिळणार होता. याशिवाय, दोन्ही देशांनी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत लष्करी तंत्रज्ञान हस्तांतरण, सायबर संरक्षण सहकार्य, गुप्तचर भागीदारी आणि पायाभूत सुविधा विकास यावरील करारांवर स्वाक्षरी केली होती. हेरिटेज फाउंडेशनच्या राष्ट्रीय संरक्षण केंद्राचे संचालक रॉबर्ट ग्रीनवे यांच्या मते, चीन इराणकडून बंदी घातलेले स्वस्त तेल खरेदी करतो आणि त्या बदल्यात त्याला तांत्रिक आणि लष्करी पाठिंबा देतो.

'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

टॅग्स :chinaचीनIsraelइस्रायलIranइराणwarयुद्धAmericaअमेरिकाrussiaरशियाXi Jinpingशी जिनपिंगDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प