'ट्रम्प आणि बायडेन यांच्या हत्येसाठी इराणने मला घेतले होते'; पाकिस्तानी व्यक्तीचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:09 IST2026-03-05T12:07:31+5:302026-03-05T12:09:44+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या वरिष्ठ राजकारण्यांच्या हत्येसाठी इराणसोबत कट रचल्याबद्दल ४७ वर्षीय पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याच्यावर अमेरिकेच्या न्यायालयात खटला सुरू झाला आहे.

'Iran hired me to assassinate donald trump and Biden Pakistani man makes sensational claim | 'ट्रम्प आणि बायडेन यांच्या हत्येसाठी इराणने मला घेतले होते'; पाकिस्तानी व्यक्तीचा खळबळजनक दावा

'ट्रम्प आणि बायडेन यांच्या हत्येसाठी इराणने मला घेतले होते'; पाकिस्तानी व्यक्तीचा खळबळजनक दावा

मागील काही दिवसांपासून मध्ये पूर्वेत तणाव सुरू आहे. अमेरिकेने आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. तर दुसरीकडे, ४७ वर्षीय पाकिस्तानी नागरिक असिफ मर्चंटविरुद्ध अमेरिकेच्या न्यायालयात एक खळबळजनक खटला सुरू झाला आहे. आसिफवर इराणसोबत मिळून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या वरिष्ठ राजकारण्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानी नागरिक असिफ मर्चंट एप्रिल २०२४ मध्ये अमेरिकेत आला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग' करण्याचा प्रयत्न केला. या काळात आसिफने एका व्यक्तीशी संपर्क साधला. हा व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट किलर शोधण्यास सक्षम असल्याचे त्याला वाटत होते.

बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणार

ज्या व्यक्तीला दिली सुपारी तोच निघाला खबरी

मर्चंट याने ज्या व्यक्तीला सुपारी दिली होती तो व्यक्ती नंतर एफबीआयची खबरी बनला. त्याने संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. मर्चंटने दोन लोकांना अ‍ॅडव्हान्स म्हणून ५,००० डॉलर दिले होते, ज्यांना तो कॉन्ट्रॅक्ट किलर मानत होता. पण ते गुप्तहेर एफबीआय एजंट असल्याचे निष्पन्न झाले.

ज्या आसिफ मर्चंटची हत्या करण्याचा कट रचत होते त्यात सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी संयुक्त राष्ट्रांच्या राजदूत निक्की हेली यांचा समावेश होता. आसिफने त्याच्या साक्षीत कबूल केले की तो ते अजिबात करू इच्छित नव्हता.

तो व्यक्ती इराणी लोकांना घाबरत होता

एका वृत्तानुसार, आसिफ मर्चंटने अमेरिकेच्या न्यायालयात सांगितले की, "मला हे इतक्या स्वेच्छेने करायचे नव्हते." तेहरानमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्याला या कटात भाग घेण्यास भाग पाडले गेले कारण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असा त्याने दावा केला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने आसिफ मर्चंटवर ट्रम्प आणि इतर राजकारण्यांच्या हत्येची योजना आखण्यासाठी अमेरिकेतील लोकांना भरती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. इराणचा सर्वोच्च कमांडर कासेम सुलेमानी यांच्या अमेरिकेतील हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. लष्करी आणि आर्थिक शक्ती तसेच मजबूत गुप्तचर नेटवर्कमुळे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स इराणमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावते.

आसिफ मर्चंटने अमेरिकेच्या न्यायालयात सांगितले की, "मला हे इतक्या स्वेच्छेने करायचे नव्हते. तेहरानमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्याला कटात भाग घेण्यास भाग पाडण्यात आले, "माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असेही त्याने कोर्टात सांगितले.

Web Title : ट्रंप, बाइडेन की हत्या के लिए ईरान ने मुझे काम पर रखा: पाकिस्तानी का दावा

Web Summary : पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चेंट पर ईरान के साथ मिलकर ट्रंप और अन्य नेताओं की हत्या की साजिश का आरोप है। उसका दावा है कि तेहरान में परिवार की सुरक्षा के लिए उस पर दबाव डाला गया, जिसके बाद वह FBI के जाल में फंस गया।

Web Title : Iran hired Pakistani man to kill Trump, Biden: Shocking claim.

Web Summary : A Pakistani man, Asif Merchant, faces US charges for plotting with Iran to assassinate Donald Trump and other politicians. He claims he was coerced to protect his family in Tehran, after being caught in an FBI sting operation.