शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Iran Israel News: इराणचे इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:49 IST

Iran Israel Conflict: अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यास किरणोत्सर्ग होण्याची भीती वाढली, लष्करी तळ टार्गेट

तेल अवीव: इस्रायल-इराण यांच्यात १३ जूनपासून सुरू असलेल्या युद्धाला आठवडा पूर्ण होत असतानाच शुक्रवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर पुन्हा हल्ले चढवले. इराणनेइस्रायलवरील हल्ले वाढवले असून, इस्रायलमधील बेर्शेबा येथे झालेल्या ताज्या हल्ल्यात इराणने क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे. इराणने क्लस्टर बॉम्ब वॉरहेड असलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलवरील ताज्या हल्ल्यांमध्ये लष्करी तळ, संरक्षण उद्योग, कमांड आणि नियंत्रण केंद्रांना लक्ष्य केल्याचे इराणच्या लष्कराने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने म्हटले की इराणच्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यास किरणोत्सर्ग होण्याची भीती आहे. तेहरानमध्ये नमाजानंतर हजारो लोकांनी इस्रायलविरुद्ध निदर्शने केली आणि त्यांच्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. इराणविरुद्ध अमेरिकेच्या धमक्यांबद्दलही घोषणा देण्यात आल्या. लोकांनी इराण, पॅलेस्टाईनचे झेंडेही फडकावले. एका निदर्शकाने सर्वोच्च नेते खामेनी यांच्या समर्थनार्थ बॅनरवर लिहिले होते, 'मी माझ्या नेत्यासाठी माझा जीव देईन. (वृत्तसंस्था)

दुसऱ्या महायुद्धाची आठवणइराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीने इस्रायलमधील नागरिक भूमिगत रेल्वे स्टेशनमध्ये आश्रय घेत आहेत. सायरन वाजू लागल्यावर पळावे लागते, त्यामुळे नागरिक सुरक्षित जागा शोधू लागले आहेत. रेल्वे स्टेशनमध्ये आश्रय घेत असलेल्या अनेकांना दुसऱ्या महायुद्धाच्या गोष्टी आठवत आहेत.

क्षेपणास्त्र प्रकल्पांवर हल्लेइस्रायलच्या ६०हून अधिक विमानांनी इराणमध्ये क्षेपणास्त्रनिर्मिती करणारे प्रकल्प आणि एसपीएनडी ही संशोधन संस्था यावर हल्ले केले तसेच केरमंशाह, तब्रीझ आणि रश्त या शहरांनाही लक्ष्य केले. इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की इराणमधील अनेक ठिकाणांवर, विशेषतः तेहरानमध्ये हल्ले करणार आहोत.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल