आखातामध्ये अमेरिका आणि इस्राइल विरुद्ध इराण असा भीषण संघर्ष सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर भयंकर हलले केले जात आहेत. या युद्धात पुढे काय होईल, याची जगाला चिंता लागलेली असताना एका चिनी प्राध्यापकाने इराणला अजब आयडिया दिली आहे. जी अंमलात आणली तर इराण एकही गोळी न झाडता अमेरिका आणि इस्राइलला पराभूत करू शकतो. इराणची केवळ एक चाल लाखो लोकांमध्ये हाहाकार माजवू शकते. तसेच ही रणनीती कुठल्याही क्षेपणास्त्र हल्ल्यापेक्षा प्रभावी ठररू शकते.
या चिनी प्राध्यापकाने सांगितले की, आखाती देशांची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांच्याकडे पिण्याच्या ताज्या पाण्याचे कुठलेही स्रोत नाही आहेत. या देशांमधील पिण्याच्या पाण्यापैकी ६० टक्के पाणी हे डिसेलिनेशनच्या प्रक्रियेच्या माध्यमातून येते. हा संपूर्ण भाग पाण्याची गरज भागवण्यासाठी मोठ्या मशिनी आणि प्लांट्सवर अवलंबून आहे. जर हे प्लांट बंद झाले तर काही तासांमध्येच या देशांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजू शकतो. आखाती देशांचा हा सर्वात मोठा कमकुवत दुवा असून, त्याकडे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे.
चिनी प्राध्यापकाने याबाबत दिलेला सल्ला खूप भयावर आहे. त्यांनी सांगितले की, इराणला आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्यासाठी फार मोठ्या सैन्य दलाची आवश्यकता नाही. केवळ एका आत्मघाती ड्रोनद्वारे एखाद्या पाण्याच्या प्लांटला लक्ष्य केलं तर लाखो लोक पाण्याविना तडफडू शकतात. एवढंच नाही तर आखाती देशांमध्ये ८० टक्के खाण्याच्या वस्तू ह्या बाहेरून येतात. ते पूर्णपणे पाणी आणि पुरवठा साखळीवर अवलंबून आहेत. पाण्याविना आखाती देशांमध्ये ना जेवण बनेल ना लोक जिवंत राहू शकतील. या माध्यमातून कुठल्याही पारंपरिक युद्धाशिवाय आखाती देशांना जेरीस आणता येऊ शकतं.
एवढंच नाही तर या माध्यमातून आखाती देशांमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांचीही कोंडी करता येऊ शकते. कारण त्यांच्यासाठी होत असलेला पाणी पुरवठा हा देखील या स्थानिक स्त्रोतांमधूनच होतो. जर जनता तहानलेली असेल आणि सगळीकडे गोंधळाचं वातावरण असेल तर अमेरिकन सैन्याचं व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरेल. तसेच त्यांना आपल्या सुरक्षेपेक्षा आपल्या लोकांना पाणी पुरवण्याची चिंता सतावेल. अशा स्थितीत कुठलाही देश गुडघे टेकू शकतो, असेही या चिनी प्राध्यापकाने म्हटले आहे.
इराणजवळ अत्याधुनिक ड्रोनचं तंत्रज्ञान आहे. तसेच ते रडाराला हुलकावणी देऊन अचूक लक्ष्यभेद करू शकतात. डिसेलिटेशन प्लांट्स हे समुद्र किनारी आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षाही आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत त्या एखाद्या हल्ल्यात नादुरुस्त झाल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी बराच काळ लागू शकतो. त्यामुळे इराणने ही चाल खेळल्यास आखाती देशांसाठी ती महागात पडू शकते.
Web Summary : A Chinese professor suggests Iran cripple Gulf states by targeting desalination plants with drones. This would trigger a water crisis, disrupt supply chains, and overwhelm American forces, forcing surrender without traditional warfare.
Web Summary : एक चीनी प्रोफेसर का सुझाव है कि ईरान ड्रोन से अलवणीकरण संयंत्रों को निशाना बनाकर खाड़ी देशों को पंगु बना दे। इससे जल संकट पैदा हो जाएगा, आपूर्ति श्रृंखला बाधित हो जाएगी और अमेरिकी सेना पर दबाव बढ़ जाएगा, जिससे पारंपरिक युद्ध के बिना आत्मसमर्पण हो जाएगा।