इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:39 IST2026-04-07T18:38:54+5:302026-04-07T18:39:19+5:30

Iran-America : या प्रस्तावावर अमेरिकेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Iran-America: Iran ready for 'Hormuz' agreement; sent peace proposal to America, made big demands | इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....

इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....

Iran-America : मध्यपूर्वेत गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या तणावामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. हे संकट दूर करण्यासाठी अमेरिकेने पाठवलेला प्रस्ताव इराणनने धुडकावून लावला होता. मात्र, आता स्वतः इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे १० सूत्रीय शांतता प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावात अमेरिका आणि इस्रायलसमोर काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणनने पाठवलेल्या या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर २ मिलियन डॉलर्स (सुमारे ₹१८ कोटी) शुल्क आकारण्याची मागणी करण्यात आली आहे. या शुल्कातील रक्कम ओमानसोबत वाटून घेतली जाईल आणि इराणचा हिस्सा युद्धात नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी वापरला जाईल.

इराणने या प्रस्तावात स्वतःवर पुन्हा हल्ला न करण्याची हमी, लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाह विरोधातील इस्रायली कारवाया थांबवणे आणि होर्मुझ मार्गावर सुरक्षित वाहतुकीसाठी स्पष्ट प्रोटोकॉल तयार करण्याची मागणीही केली आहे. याच्या बदल्यात, इराणने होर्मुझवरील आपले अप्रत्यक्ष निर्बंध हटवण्याची तयारी दर्शवली आहे.

विशेष म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक या मार्गातून होत असल्याने, या भागातील कोणतीही अस्थिरता जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करू शकते. या प्रस्तावावर अमेरिका आणि सहयोगी देशांची भूमिका काय असेल, याकडे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान 'हॉर्मुज़' समझौते के लिए तैयार, अमेरिका को शांति प्रस्ताव भेजा

Web Summary : ईरान ने शांति का प्रस्ताव रखा, होर्मुज जलडमरूमध्य में प्रति जहाज 2 मिलियन डॉलर की मांग की। धन युद्धग्रस्त बुनियादी ढांचे के पुनर्निर्माण में लगेगा। सुरक्षा गारंटी और प्रतिबंध हटाने की भी मांग की।

Web Title : Iran Ready for 'Hormuz' Deal, Offers Peace Plan to US

Web Summary : Iran proposes peace, demanding $2M per ship in Hormuz Strait. Funds would rebuild war-torn infrastructure. They also seek security guarantees, lifting of restrictions in return.