आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:22 IST2025-04-28T19:21:00+5:302025-04-28T19:22:34+5:30

Plane Emergency Landing: अनेकदा तांत्रिक बिघाड किंवा इतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यामुळे विमानांना तातडीने खाली उतरवलं जातं. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मात्र यावेळी कुठल्या तांत्रित बिघाडामुळे नव्हे तर एका आयपॅडमुळे विमानाला तातडीने खाली उतरवावं लागलं आहे.

iPad causes chaos on plane, emergency situation, emergency landing required, what is the reason? | आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 

आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 

गेल्या काही काळात व्यावसायिक विमान प्रवास हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र अशा विमान प्रवासादरम्यान, अनेकदा तांत्रिक बिघाड किंवा इतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यामुळे विमानांना तातडीने खाली उतरवलं जातं. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मात्र यावेळी कुठल्या तांत्रित बिघाडामुळे नव्हे तर एका आयपॅडमुळे विमानाला तातडीने खाली उतरवावं लागलं आहे. लुफ्तान्सा एअरबस ए३८० या विमानामधून तब्बल ४६१ प्रवासी प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाला अमेरिकेतील बोस्टन येथील विमानतळावर तातडीने उरवावं लागलं.

त्याचं झालं असं की, विमानातून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाकडे अॅपलचा आयपॅड होता. हा आयपॅड बिझनेस क्लासमधील सिटमध्ये अडकला. तसेच तो ओव्हरहिट होत असल्याचे संकेत मिळू लागले. त्यामुळे विमानाला तातडीने खाली उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे विमान बुधवारी लॉस एजिंल्स येथून म्युनिककडे रवाना झालं होतं. तसेच सुमारे तीन तास उड्डाण केल्यानंतर त्याला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत विमान कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, जेव्हा विमान वळवण्यात आलं तोपर्यंत सिटच्या हालचालीमुळे टॅब तुटला असल्याच्या खुणा दिसत होत्या. विमान कर्मचारी आही हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने कुठलाही गंभीर प्रसंग उदभवू नये म्हणून विमानाला तातडीने खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.  आम्हाला कुठलाही संभाव्य धोका टाळायचा होता. विशेषकरून ओव्हरहिटिंगचा धोका टाळायचा होता, असे विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

या घटनेमुळे खराब झालेली लिथियम बॅटरी किती धोकादायक ठरू शकते हे समोर आले. यामधून थर्मल रनवे नावाच्या चेन रिअॅक्शनची सुरुवात होऊ शकते. तसेच विमानात जेव्हा असं घडतं तेव्हा ते अधिकच धोकादायक ठरू शकतं. दरम्यान, बोस्टन येथील विमानतळावर विमान सुरक्षित उतरल्यानंतर लुफ्तांसाच्या एका टीमने विमानात जाऊन हा आयपॅड सुखरूपपणे बाहेर काढला, तसेच त्याची तपासणी केली. तसेच आता धोका टळला आहे हे लक्षात येताच विमानाला पुढे रवाना करण्यात आले.  

Web Title: iPad causes chaos on plane, emergency situation, emergency landing required, what is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.