भयावह! इन्शुरन्स कंपनीच्या सीईओला तरुणाने संपविले; लोक आनंदात, आरोपीला म्हणतायत हिरो; ही परिस्थिती कशामुळे आली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:28 IST2024-12-16T11:27:30+5:302024-12-16T11:28:41+5:30
United Healthcare CEO Murder: अमेरिकेत यूनाइडटेड हेल्थकेयरच्या सीईओची हत्या, हत्येनंतर लोक हल्लेखोराला वाचविण्यासाठी पैसे गोळा करत आहेत, का?

भयावह! इन्शुरन्स कंपनीच्या सीईओला तरुणाने संपविले; लोक आनंदात, आरोपीला म्हणतायत हिरो; ही परिस्थिती कशामुळे आली...
अमेरिकेतील अब्जाधीश असलेले व एका मोठ्या होल्थकेअर कंपनीचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका अब्जाधीशाची हत्या झाली तरी अमेरिकन नागरिकांत त्या अब्जाधीशाबाबत दु:ख, आक्रोश नाही तर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हा भयावह प्रकार इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचे वागणे सुधारण्यासाठी धोक्याची घंटा वाजविणारा आहे.
थॉम्पसन यांची हत्या करणारा आरोपी हा २६ वर्षांचा आहे. लुईगी मैंगियोन असे त्याचे नाव असून अमेरिकी जनता त्याला हिरो मानू लागली आहे. त्याची केस लढण्यासाठी लाखोंच्या पटीत फंड उभा केला जात आहे. त्याला सोडविण्यासाठी ऑनलाईन मोहिमा सुरु केल्या जात आहेत. मोठ्या संख्येने त्याच्या समर्थनार्थ लोक सोशल मीडियावर लिहू लागले आहेत. एखाद्याच्या हत्येनंतर अशी परिस्थिती उभी ठाकणे ही भयावह आहे. रस्त्या रस्त्यावर सीईओचे वॉन्टेड म्हणून फोटो लावले जात आहेत. ही परिस्थिती का आली, यावर आता इन्शुरन्स क्षेत्रातील तज्ञ मत व्यक्त करू लागले आहेत.
एखादा व्यक्ती अडीनडीच्या काळात, आजारी पडल्यावर किंवा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक मदत मिळावी म्हणून इन्शुरन्स काढतो. परंतू, कंपन्या काही ना काही कारण सांगून त्या इन्शुरन्स धारकाला किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स देणे टाळतात. या कंपन्यांना त्या इन्शुरन्स धारकाला मदत करण्याऐवजी आपल्या नफ्याची चिंता लागून राहिलेली असते. यामुळे इन्शुरन्स कंपन्यांविरोधात भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांत संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.
हे लोक इन्शुरन्स कंपन्यांच्या कार्यप्रणालीमुळे त्रस्त झालेले आहेत. क्लेम रिजेक्शनच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये रोष आहे. यूनाइडटेड हेल्थकेयरच्या सीईओची हत्या का करण्यात आली याचे कारण समोर आलेले नसले तरी लोकांमधील बाहेर येत असलेली संतापाची भावना, एखाद्याच्या मृत्यूवर जसे की तो मोठा अपराधी, नराधम आहे त्यालाच संपविले, यामुळे सुरु असलेला जल्लोष आदी गोष्टी पाहता या इन्शुरन्स कंपन्यांनी किती लोकांवर अत्याचार केले आहेत याची जाणीव होत आहे.
इन्शुरन्स कंपन्यांमध्ये क्लेम सेटल करण्यास विलंब, रिजेक्शन आणि तो का रिजेक्ट केला याचा निर्णय घेण्यासाठी बचाव आदी गोष्टींमुळे लोक त्रस्त आहेत. पोलिसांना घटनास्थळावर ज्या बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या, त्यावर डिले, डिनाय आणि पॉसिबली डिपोज असे लिहिलेले होते. कंपन्या ३डी या एकाच तत्वावर काम करतात. यामध्ये क्लेम आला तर तो डिले, डिनाय आणि डिफेंड करायचे धोरण अवलंबिले जाते. हेच या कंपन्य़ांचे धोरण बनले असून सीईओची हत्या यामागचा आक्रोश असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.