शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 5:57 AM

दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेक्यांची घुसखोरी : ३०० ते ३५० अतिरेकी एलओसीजवळ दबा धरून बसले

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सुरक्षा दलाने असे प्रयत्न हाणून पाडले आहेत, अशी माहिती ले. जनरल केजेएस धील्लन यांनी दिली. तथापि, ३०० ते ३५० अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे, तर गत दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धिल्लन यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न झाला नाही, असा एकही दिवस गेला नाही. पाकिस्तानने उघडपणे जाहीर केलेले आहे की, काश्मिरींच्या मदतीसाठी आम्ही सर्वकाही करू. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी काश्मिरींना उघड समर्थन दिले आहे. मे आणि जूनमध्ये घुसखोरीत घट झाली होती. कारण, पाकिस्तानला अशी आशा होती की, मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर चर्चेचा मार्ग मोकळा होईल. नियंत्रण रेषेनजीकचे लाँच पॅडही जुलैअखेरीस रिकामे करण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सध्या दररोज किमान १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीदपाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर व गावांवर उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. यात एक जवान शहीद झाला. पूंछ सेक्टरमध्ये शाहपूर-केरनी भागातील सीमेवर ही घटना घडली. पाकने अनेक ठिकाणी गोळीबारही केला. भारताने याला चोख प्रत्युत्तर दिले. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पूंछ व राजौरी जिल्ह्यांचा दौरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला आहे.पाक म्हणतो, आम्ही चर्चेस तयारपरराष्ट्रमंत्री कुरेशी म्हणाले, भारताने काही अटी मान्य कराव्यातइस्लामाबाद : काश्मीरमधील नेत्यांशी भेट घेण्याच्या परवानगीसह काही अटी मान्य केल्यास भारताशी पाकिस्तान चर्चा करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी म्हटले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्नी भारताशी चर्चा करण्यास तसेच त्रयस्थ देशाची मध्यस्थी स्वीकारण्यास पाकिस्तान तयार आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानच्या काही अटी भारताने मान्य करायला हव्यात. ३७० कलम रद्द केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये लागू केलेली संचारबंदी व अन्य निर्बंध भारताने हटविले पाहिजेत. स्थानिक नागरिकांच्या हक्कांची होत असलेली गळचेपी थांबवली पाहिजे. अटक केलेल्या काश्मिरी नेत्यांची भारताने सुटका करावी.कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने चर्चेला कधीच नकार दिला नव्हता. मात्र अशा चर्चेसाठी भारतच तयार नसल्याचे जाणवत आहे. भारताने परवानगी दिल्यास काश्मीरी नेत्यांची मी भेट घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहे.काश्मीरी जनतेच्या भावना पायदळी तुडविल्या जाणे थांबायला हवे. आखाती देशांचा भारताशी मोठा व्यापार व उत्तम संबंध आहेत. तरीदेखील या देशांनी काश्मीरबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली असल्याचा दावा कुरेशी यांनी केला.दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता नाहीच्भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी फेटाळून लावली आहे. पाकिस्तानने कधीही आक्रमक पवित्रा घेतला नसून शांती प्रस्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असा दावाही त्यांनी केला. मात्र पाकिस्तानवर युद्ध लादले गेल्यास त्याचा सामना करण्यास आमचे लष्कर व जनता समर्थ आहे अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.च्भारताबरोबर असलेल्या मतभेदांवर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढावा अशी पाकिस्तानची भूमिका आहे.

टॅग्स :BorderसीमारेषाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान