Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:53 IST2025-07-28T14:37:28+5:302025-07-28T14:53:21+5:30
Thailand Shooting News: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोवमारी गोळीबाराची भीषण घटना घडली असून, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. हा गोळीबार एका लोकप्रिय फ्रेश फूड मार्केटमध्ये झाला.

Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोवमारी गोळीबाराची भीषण घटना घडली असून, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. हा गोळीबार एका लोकप्रिय फ्रेश फूड मार्केटमध्ये झाला. आता पोलीस या घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहेत, अशी माहिती बँक सुए जिल्ह्यातील उप पोलीस प्रमुख वोरापत सुकथाई यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा हल्लेखोर कोण होता याची माहिती घेतली जात आहे. तसेच या गोळीबाराचा सध्या थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेल्या वादाशी काही संबंध नाही ना याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, पॉप्युलर फूड मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात मारले गेलेले चारही सुरक्षा रक्षक हे याच बाजारात काम करत होते.