भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:55 IST2026-04-07T15:54:11+5:302026-04-07T15:55:57+5:30

BrahMos Missile Scientist Death: ब्रह्मोस मिसाईल प्रोजेक्टचे रशियन शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. झिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे डिझायनर आणि भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक असलेल्या या महान शास्त्रज्ञाची कारकीर्द जाणून घ्या.

India's pride, the creator of Brahmos missile, has lost it; Senior scientist Alexander Leonov passes away | भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन

भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचणाऱ्या आणि भारताची शान असलेल्या 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र प्रकल्पाचे महत्त्वाचे शिल्पकार आणि रशियाचे दिग्गज क्षेपणास्त्र डिझायनर अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे ५ एप्रिल रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. लिओनोव्ह यांच्या निधनाने जागतिक संरक्षण क्षेत्रात, विशेषतः भारत आणि रशियाच्या संयुक्त संरक्षण प्रकल्पांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ब्रह्मोस आणि लिओनोव्ह यांचे नाते
अलेक्झांडर लिओनोव्ह हे रशियाच्या प्रसिद्ध 'NPO माशिनोस्ट्रोएनिया' (NPOMASH) या एयरोस्पेस कंपनीचे सीईओ आणि मुख्य डिझायनर होते. ही कंपनी भारताच्या डीआरडीओसोबत 'ब्रह्मोस एरोस्पेस'मध्ये मुख्य भागीदार आहे. जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ब्रह्मोस'च्या विकास प्रवासात लिओनोव्ह यांचा मोलाचा वाटा होता.

'झिरकॉन' हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे जनक
लिओनोव्ह केवळ ब्रह्मोसपुरते मर्यादित नव्हते. रशियाच्या ताफ्यातील 'झिरकॉन' या महाविनाशक हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे डिझाइन करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. याशिवाय त्यांनी ग्रेनिट, वल्कन आणि बास्टियन यांसारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि कोस्टल डिफेन्स सिस्टमच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ब्रह्मोस: जगातील सर्वात वेगवान अस्त्र
भारत आणि रशियाच्या मैत्रीचे प्रतीक असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र आज जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. 'ऑपरेशन सिंदूर'मध्येही या क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर करण्यात आला होता. लिओनोव्ह यांनी दिलेल्या तांत्रिक योगदानामुळेच आज भारत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतीय संरक्षण वर्तुळातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title : ब्रह्मोस मिसाइल के जनक अलेक्जेंडर लियोनोव का निधन, भारत में शोक

Web Summary : ब्रह्मोस मिसाइल परियोजना के प्रमुख वास्तुकार और रूसी डिजाइनर अलेक्जेंडर लियोनोव का 5 अप्रैल को 74 वर्ष की आयु में निधन हो गया। उन्होंने ब्रह्मोस और जिरकॉन हाइपरसोनिक मिसाइलें बनाईं। उनके काम ने भारत को रक्षा आत्मनिर्भरता की ओर बढ़ाया।

Web Title : BrahMos Missile Pioneer Alexander Leonov Passes Away, India Mourns Loss

Web Summary : Alexander Leonov, key BrahMos missile project architect and Russian designer, died April 5th at 74. He co-created the BrahMos missile and Zircon hypersonic missile. His work propelled India toward defense self-reliance.