भारताचे मोदी मॉडेल पाकिस्तानात लागू होणार? माजी पंतप्रधानांची कन्या मरियम नवाज यांचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:36 AM2024-02-28T11:36:48+5:302024-02-28T11:42:54+5:30

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात नवीन विकास मॉडेल सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री नरियम नवाज यांनी दिली.

India's Modi model will be applied in Pakistan Former Prime Minister's daughter Maryam Nawaz's plan | भारताचे मोदी मॉडेल पाकिस्तानात लागू होणार? माजी पंतप्रधानांची कन्या मरियम नवाज यांचा प्लॅन

भारताचे मोदी मॉडेल पाकिस्तानात लागू होणार? माजी पंतप्रधानांची कन्या मरियम नवाज यांचा प्लॅन

पाकिस्तानमध्ये आता विकासासाठी भारतातील मोदी मॉडेल लागू करणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पहिल्या मुख्यमंत्री मरियन नवाज यांनी आता विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी मांडलेला विकास आराखडा पीएम मोदींच्या आर्थिक धोरणांशी मिळतीजुळती असल्याचा दावा केला जात आहे. मरियम ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आहेत.

दोघांनाही ३४-३४ मते, ईश्वरी चिठ्ठीदेखील सिंघवींच्या नावाची, पण राज्यसभेचा नियम उलटा फिरला... हरले...

पीओकेमधील निर्वासित मानवाधिकार कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी नवाज यांच्या विकास मॉडेलची तुलना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक मॉडेलशी केली आहे. "स्मार्ट शहरे, आर्थिक उपक्रम, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ आणि रस्त्यांचे जाळे, आरोग्य व्यवस्था, मरियम यांना ​​त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात ज्या गोष्टी लागू करायच्या आहेत ते भारतात मोदींनी आधी केले आहे त्यांचे ते आर्थिक मॉडेल आहेत.

नुकतेच निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या विजयी भाषणात पंजाबचा विकास आराखडा मांडला. पंजाबला आर्थिक केंद्र बनवण्यासाठी मी धोरणे तयार करणार असल्याचे त्यांनी भाषणात म्हटले होते.

अमजद अयुब मिर्झा म्हणाले, इथे प्रश्न असा आहे की नोकरशाही आणि राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांना पंजाबमध्ये जे मॉडेल तयार करायचे आहे ते कसे यशस्वी होईल. लष्करी-औद्योगिक संकुलाला, लष्कराच्या व्यवसायाचा सामना कसा करणार? खासगी क्षेत्राच्या वाढीमुळे ते खूश होणार नाहीत. पंजाबचा प्रत्येक प्रदेश मजबूत लष्करी अर्थव्यवस्थेने प्रभावित आहे, असंही मिर्झा म्हणाले. 

Web Title: India's Modi model will be applied in Pakistan Former Prime Minister's daughter Maryam Nawaz's plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.