शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:40 IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची रोखठोक भूमिका; म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना ओळखतो...’

मॉस्को/सोची (रशिया)  : अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी केले. मी पंतप्रधान मोदी यांना ओळखतो, भारतीय लोक कधीही अपमान सहन करत नाहीत, असेही पुतिन म्हणाले. दक्षिण रशियातील सोची येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल वाल्दाई डिस्कशन पॉलिसी फोरम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत पुतिन बोलत होते. या परिषदेत भारतासह १४० देश सहभागी झाले आहेत.

परिषदेला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांना ओळखतो. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाणारे निर्णय ते कधीच घेणार नाहीत. भारतीय लोक कधीच अपमान सहन करत नाहीत. भारतीय लोक त्यांच्या नेत्यांच्या निर्णयांवर लक्ष ठेवतात. हा देश कधीच कोणासमोर झुकण्याची इच्छा करीत नाही. त्यामुळेच मला खात्री आहे की, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही. भारताने रशियन तेलाची खरेदी थांबविली, तर त्याला १ ते १० अब्ज डॉलरचे नुकसान होईल, असा इशाराही पुतिन यांनी दिला. त्यामुळे ट्रम्प आता काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)

भारताकडून अधिक खरेदी करणारदोन्ही देशांतील व्यापार असमतोलामुळे होणारे भारताचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश यावेळी पुतिन यांनी आपल्या प्रशासनास दिले. यामध्ये भारताकडून अधिक शेतीउत्पादने व औषधांची खरेदी करण्याचा समावेश असेल. त्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या प्रशासनास दिले. भारत मोठ्या प्रमाणात रशियन कच्चे तेल आयात करत असल्याने हा असमतोल निर्माण झाला आहे. येत्या डिसेंबरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणार असलेल्या वार्षिक शिखर परिषदेपूर्वी पुतिन यांनी ही घोषणा केली आहे. 

तर तेल १०० डॉलरच्या पुढे पुतिन यांनी म्हटले की, रशियाच्या व्यापारी भागीदारांवर उच्च टॅरिफ लादल्यास जगभरातील तेलाच्या किमतीवर परिणाम होईल. तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर जातील. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढवावे लागतील. अमेरिकी अर्थव्यवस्था मंदावेल. रशियाच्या तेलाविना जागतिक अर्थव्यवस्थेचेही नुकसान होईल.

भारत-रशिया सोव्हिएट काळापासूनचे मित्रपुतिन म्हणाले की, रशिया-भारत संबंध सोव्हिएत काळापासून ‘विशेष’ आणि ‘मैत्रीपूर्ण’ राहिले आहेत. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय विषयांवर नेहमीच समन्वय साधत आले आहेत.

रशियाने युक्रेनवर ३८१ ड्रोन व ३५ क्षेपणास्त्रे डागलीकिव्ह : रशियाने गुरुवारी रात्री युक्रेन सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या प्रकल्पावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात रशियाने ३८१ ड्रोन व ३५ क्षेपणास्त्रांचा वापर केला असून आजपर्यंतचा रशियाने केलेला हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Won't Bow to US Pressure: Putin Affirms Strong Ties

Web Summary : Putin declared India won't succumb to US pressure, citing PM Modi's strong stance on sovereignty. He highlighted historical Russia-India ties, pledging increased Indian imports to balance trade. Putin warned higher tariffs would elevate oil prices, while Russia launched a major drone and missile attack on Ukraine.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशिया