शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून ओलांडू नका इराणची सीमा, भारतीयांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:22 IST

दूतावासाचे निवेदन, वाहतूक, स्थलांतराशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो

दुबई : इराणमध्ये सध्या असलेल्या भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय कोणतीही सीमा ओलांडू नये, अशा सूचना भारताने सोमवारी जारी केल्या.

 तेहरानमधील सद्य:स्थिती पाहता दूतावासाच्या माहिती व मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही सीमेद्वारे इराणमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांना वाहतूक व स्थलांतराशी संबंधित गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे या निवेदनात म्हटले आहे. इराणमधून बाहेर पडणाऱ्यांनी भारतीय दूतावासाला त्या संदर्भात स्पष्ट माहिती देणे वा त्यांच्याशी सतत संपर्कात असणे आवश्यक आहे. जे कोणी या सूचना न पाळता इराणच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना मदत करणे शक्य होणार नाही, असे या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.यासंदर्भातील चौकशी किंवा आपत्कालीन मदतीसाठी दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. हेल्पलाइन:    ९८-९१२ ८१० ९११५, ९८-९१२८१०९१०२, ९८-९१२८१०९१०९, ९८-९९३२१७९३५९, ई-मेल: cons.tehrant@mea.gov.in. इराणमधील भारतीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरून न जाता दूतावासाने दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करावे. 

लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिण उपनगरातील 'दाहियेह' परिसरात इस्रायली हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचा ढिगारा आणि विखुरलेले अवशेष. या भीषण हल्ल्यामुळे परिसरातील रस्ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

इराणी नागरिकांची इराककडे धाव युद्धामुळे दीर्घकाळ बंद असलेली इराण-इराक सीमा उघडताच रविवारी अनेक इराणी नागरिक स्वस्त अन्नधान्य खरेदी, इंटरनेटसाठी, नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी व रोजगाराच्या शोधात उत्तर इराकमध्ये दाखल झाले. इराकच्या कुर्द भागातून मालाने भरलेले ट्रक हाजी ओमेरान सीमेवरील चौकीमार्गे इराणकडे जाताना दिसले. 

नेतान्याहूंचा पुन्हा व्हिडीओ; म्हणाले ‘मी जिवंत आहे’सोशल मीडियावरील मृत्यूच्या अफवांना उत्तर देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी पुन्हा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओद्वारे ते जिवंत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे ९० सेकंदांच्या या व्हिडीओत नेतान्याहू जेरुसलेम हिल्स परिसरात लोकांशी संवाद साधताना दिसतात.

‘होर्मुजमधील हल्ले तत्काळ थांबवा’अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुज सामुद्रधुनीत आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी चीनसह इतर देशांनी मदत करावी, अशा केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर चीनने या प्रदेशातील लष्करी हल्ले तत्काळ थांबवावेत, असे उत्तर दिले. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जिआय यांनी हॉर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे क्षेत्रिय शांतता, जागतिक स्थैर्यावर परिणाम झाला आहे, ऊर्जासंकटही उभे झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील लष्करी कारवाया थांबवण्याचे  आवाहन केले. 

 हा संघर्ष वाढल्यास जागतिक आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. हल्ल्यांमुळे अनेक लष्करी, गुप्तचर आणि पोलिस ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't cross Iran border risking lives, advisory issued to Indians.

Web Summary : India advises citizens in Iran to contact the embassy before crossing borders due to potential transit issues. Embassy helplines are available for assistance. Other news includes Iran-Iraq border opening, Netanyahu's video denying death rumors, and China urging halt to Hormuz Strait attacks.
टॅग्स :IranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाIndiaभारत