शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

नोकरीवरून काढलं म्हणून १२०० अकाऊंट केले डिलिट!; भारतीयाला अमेरिकेत २ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 3:19 PM

Indian sentenced to 2 years for deleting company accounts: नोकरीवरुन काढून टाकलं म्हणून १२०० हून अधिक सहकारी कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत एका भारतीय व्यक्तीनं केला आहे.

Indian sentenced to 2 years for deleting company accounts: नोकरीवरुन काढून टाकलं म्हणून १२०० हून अधिक सहकारी कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत एका भारतीय व्यक्तीनं केला आहे. कॅलिफोर्निया कोर्टानं या व्यक्तीला दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नोकरीवरुन काढून टाकलं म्हणून दिपांशू खेर यानं कंपनीच्या सर्व्हरपर्यंत पोहचून मायक्रोसॉफ्टचे जवळपास १२०० यूझर्सचे अकाऊंट डिलिट करुन टाकले. दिपांशु ११ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीहून अमेरिकेत पुन्हा परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. 

दिपांशु याला त्याच्याविरोधातील वॉरंटची माहिती देण्यात आली नव्हती. "कंपनीला नुकसान पोहचविण्यासाठी दिपांशुनं केलेलं कृत्य हे विनाशकारी होतं", असं अमेरिकेचे न्यायाधीश रँडी ग्रॉसमॅन यांनी सांगितलं. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मर्लिन हफ यांनी खटल्याचा निकाल देताना दिपांशु खेर यानं जाणीवपूर्वक कंपनीवर हल्ला केला. सूड घेण्याच्या उद्देशातून पूर्वनियोजित कटानुसार खेर यानं कंपनीला नुकसान पोहोचवलं आहे, असं अधोरेखित केलं. कोर्टानं खेर याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्याच्या कृत्यामुळे कंपनीला झालेल्या ५,६७,०८४ डॉलरच्या नुकसान भरपाईचे आदेशही देण्यात आले आहेत. 

नेमकं काय घडलं?कोर्टात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, खेर यानं २०१७ पासून ते मे २०१८ पर्यंत एका आयटी कंपनीत नोकरी केली. २०१७ साली त्याच्या कंपनीचे सेवा कार्ल्सबॅड कंपनीनं घेतली. यात त्याला मायक्रोसॉप्ट ऑफिस ३६५ मध्ये शिफ्ट व्हावं लागणार होतं. त्यासाठी कंपनीनं खेर याला मदतीसाठी पाठवलं. पण खेर याच्या कामावर कंपनी खुश नव्हती. हिच गोष्ट कंपनीनं खेर याच्या कंपनीला सांगितली. त्यानंतर खेर याला २०१८ साली कंपनीनं आपल्या मुख्यालयातून त्याला माघारी बोलवलं. त्यानंतर काही महिन्यांनी ४ मे २०१८ रोजी दिपांशु खेर याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं व तो दिल्लीला परतला. 

कंपनीचे अकाऊंट केले हॅक८ ऑगस्ट २०१८ रोजी भारतात परतल्यानंतर दिपांशु खेर यानं कार्ल्सबॅड कंपनीचा सर्व्हर हॅक केला आणि एकूण १५०० पैकी १२०० अकाऊंट डिलिट करुन टाकले. दिपांशुच्या या कृत्यामुळे कंपनीला खूप मोठं नुकसान झालं. कंपनीचं काम पूर्णपणे ठप्प पडलं, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. कंपनीच्या आयटी विभागाच्या अध्यक्षानं दिलेल्या माहितीनुसार, दिपांशुच्या कृत्यामुळे कंपनीच्या अंतर्गत आणि बाह्य कामांवरही खूप परिणाम झाला. कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट झाल्यानं त्यांना आपले ई-मेल देखील पाहता येत नव्हते. त्यांच्याकडची सर्व माहिती डिलिट झाली होती. कॉन्टॅक्ट लिस्ट, मिटिंग कॅलेंडर, डायरेक्टरी अशी सर्व माहिती नष्ट झाली.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका