नोकरीवरून काढलं म्हणून १२०० अकाऊंट केले डिलिट!; भारतीयाला अमेरिकेत २ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:21 IST2021-03-24T15:19:58+5:302021-03-24T15:21:50+5:30
Indian sentenced to 2 years for deleting company accounts: नोकरीवरुन काढून टाकलं म्हणून १२०० हून अधिक सहकारी कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत एका भारतीय व्यक्तीनं केला आहे.

नोकरीवरून काढलं म्हणून १२०० अकाऊंट केले डिलिट!; भारतीयाला अमेरिकेत २ वर्षांची शिक्षा
Indian sentenced to 2 years for deleting company accounts: नोकरीवरुन काढून टाकलं म्हणून १२०० हून अधिक सहकारी कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत एका भारतीय व्यक्तीनं केला आहे. कॅलिफोर्निया कोर्टानं या व्यक्तीला दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नोकरीवरुन काढून टाकलं म्हणून दिपांशू खेर यानं कंपनीच्या सर्व्हरपर्यंत पोहचून मायक्रोसॉफ्टचे जवळपास १२०० यूझर्सचे अकाऊंट डिलिट करुन टाकले. दिपांशु ११ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीहून अमेरिकेत पुन्हा परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
दिपांशु याला त्याच्याविरोधातील वॉरंटची माहिती देण्यात आली नव्हती. "कंपनीला नुकसान पोहचविण्यासाठी दिपांशुनं केलेलं कृत्य हे विनाशकारी होतं", असं अमेरिकेचे न्यायाधीश रँडी ग्रॉसमॅन यांनी सांगितलं. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मर्लिन हफ यांनी खटल्याचा निकाल देताना दिपांशु खेर यानं जाणीवपूर्वक कंपनीवर हल्ला केला. सूड घेण्याच्या उद्देशातून पूर्वनियोजित कटानुसार खेर यानं कंपनीला नुकसान पोहोचवलं आहे, असं अधोरेखित केलं. कोर्टानं खेर याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्याच्या कृत्यामुळे कंपनीला झालेल्या ५,६७,०८४ डॉलरच्या नुकसान भरपाईचे आदेशही देण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
कोर्टात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, खेर यानं २०१७ पासून ते मे २०१८ पर्यंत एका आयटी कंपनीत नोकरी केली. २०१७ साली त्याच्या कंपनीचे सेवा कार्ल्सबॅड कंपनीनं घेतली. यात त्याला मायक्रोसॉप्ट ऑफिस ३६५ मध्ये शिफ्ट व्हावं लागणार होतं. त्यासाठी कंपनीनं खेर याला मदतीसाठी पाठवलं. पण खेर याच्या कामावर कंपनी खुश नव्हती. हिच गोष्ट कंपनीनं खेर याच्या कंपनीला सांगितली. त्यानंतर खेर याला २०१८ साली कंपनीनं आपल्या मुख्यालयातून त्याला माघारी बोलवलं. त्यानंतर काही महिन्यांनी ४ मे २०१८ रोजी दिपांशु खेर याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं व तो दिल्लीला परतला.
कंपनीचे अकाऊंट केले हॅक
८ ऑगस्ट २०१८ रोजी भारतात परतल्यानंतर दिपांशु खेर यानं कार्ल्सबॅड कंपनीचा सर्व्हर हॅक केला आणि एकूण १५०० पैकी १२०० अकाऊंट डिलिट करुन टाकले. दिपांशुच्या या कृत्यामुळे कंपनीला खूप मोठं नुकसान झालं. कंपनीचं काम पूर्णपणे ठप्प पडलं, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. कंपनीच्या आयटी विभागाच्या अध्यक्षानं दिलेल्या माहितीनुसार, दिपांशुच्या कृत्यामुळे कंपनीच्या अंतर्गत आणि बाह्य कामांवरही खूप परिणाम झाला. कर्मचाऱ्यांचे अकाऊंट डिलिट झाल्यानं त्यांना आपले ई-मेल देखील पाहता येत नव्हते. त्यांच्याकडची सर्व माहिती डिलिट झाली होती. कॉन्टॅक्ट लिस्ट, मिटिंग कॅलेंडर, डायरेक्टरी अशी सर्व माहिती नष्ट झाली.