शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरचे पाते लागून कैलाश मानसरोवर यात्रेकरुचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 12:38 IST

कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या एका 42 वर्षिय यात्रेकरुचा नेपाळमध्ये हेलिकॉप्टरचे पाते लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.

काठमांडू/नवी दिल्ली- कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या एका 42 वर्षिय यात्रेकरुचा नेपाळमध्ये हेलिकॉप्टरचे पाते लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. नेपाळच्या हिल्सा या डोंगराळ विभागामध्ये हे हेलिकॉप्टर उतरल्यावर हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूस असणारे पाते लागल्यामुळे नागेंद्र कुमार कार्तिक मेहता या यात्रेकरुचे प्राण गेले.मुळचे मुंबईचे असलेले नागेंद्र कुमार कार्तिक मेहता कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी महेश कुमार पोखरेल यांनी दिली. हा अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टर जमिनीवर होते.

हेलिकॉप्टरपासून यात्रेकरुंनी दूर राहाणे अपेक्षित होते मात्र काही कारणाने नागेंद्र कुमार हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूस गेले आणि त्यांना रोटरच्या पात्याचा धक्का लागला. त्यांचा मृतदेह सिमिकोट येथे पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला असून त्यानंतर तो नातलगांकडे सोपविण्यात येईल. या अपघातानंतर हेलिकॉप्टरच्या मागच्या भागाचे नुकसान झाले आहे.

नेपाळचा सिमीकोट आणि हिल्सा हा भाग केवळ लहान विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीनेच इतर जगाशी जोडलेला आहे. इतर कोणत्याही मार्गाने येथे जाता येत नाही.कैलाश मानसरोवर हे धार्मिकस्थळ चीनव्याप्त तिबेटमध्ये असून दरवर्षी हजारो भारतीय या यात्रेसाठी जातात. मात्र ही यात्रा अत्यंत खडतर प्रवास करुन पूर्ण करावी लागते.

टॅग्स :AccidentअपघातHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाNepalनेपाळIndiaभारत