UAE विमान अपघातात भारतीय वंशाच्या डॉक्टरचा मृत्यू! जाणून घ्या, कोण आहे हा २६ वर्षीय तरुण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:26 IST2025-01-01T13:23:59+5:302025-01-01T13:26:52+5:30

विमान अपघातात एका पाकिस्तानी महिला पायलटचाही मृत्यू झाला

Indian Origin 26-year-old Doctor Sulaymaan Al Majid Among 2 killed In UAE Plane Crash with Pakistani woman | UAE विमान अपघातात भारतीय वंशाच्या डॉक्टरचा मृत्यू! जाणून घ्या, कोण आहे हा २६ वर्षीय तरुण?

UAE विमान अपघातात भारतीय वंशाच्या डॉक्टरचा मृत्यू! जाणून घ्या, कोण आहे हा २६ वर्षीय तरुण?

Sulaymaan Al Majid: UAE मध्ये विमान अपघातात भारतीय वंशाच्या डॉक्टरचा मृत्यू झाला. २६ डिसेंबर रोजी यूएईमध्ये एक विमान कोसळले. विमान अपघातात तिघांचा मृत्यू झाला. याच अपघातात भारतीय वंशाच्या २६ वर्षीय डॉक्टर सुलेमान अल माजीदचाही मृत्यू झाला. २६ डिसेंबर रोजी रस अल खैमाहच्या किनारपट्टीवर ही घटना घडली. या अपघातात भारतीय वंशाच्या डॉक्टरांसह २६ वर्षीय पायलट आणि एका पाकिस्तानी महिलेचाही मृत्यू झाला.

अपघात कसा झाला?

भारतीय वंशाचे डॉ. सुलेमान अल माजीद यांचा जन्म UAE मध्ये झाला होता. त्याचे वडील माजिद मुकर्रम यांनी सांगितले की, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विमान उड्डाणानंतर काही वेळातच ते कोसळले. जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (GCAA) ने या विमान अपघाताची पुष्टी केली. हा अपघात कसा झाला आणि विमानात काय चूक झाली याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दुबईच्या मीडिया रिपोर्टनुसार, विमान जझीरा एव्हिएशन क्लबचे होते. डॉ. सुलेमान यांनी एक हलके विमान भाड्याने घेतले होते आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी विमानात उड्डाण केले होते. त्याचे वडील, आई आणि धाकटा भाऊ – हा अनुभव पाहण्यासाठी एव्हिएशन क्लबमध्ये उपस्थित होते. सुलेमानच्यानंतर त्याचा धाकटा भाऊही याच विमानातून उड्डाण करणार होता.

कुटुंब शोकसागरात

सुलेमानच्या वडिलांनी सांगितले की, सर्वप्रथम आम्हाला सांगण्यात आले की ग्लायडरशी रेडिओचा संपर्क तुटला आहे. नंतर आम्हाला सांगण्यात आले की त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की दोघेही गंभीर जखमी आहेत. आम्ही सुलेमानला पाहण्याआधीच संध्याकाळी ४.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.

डॉ. सुलेमान कोण होते?

डॉ. सुलेमान यांनी यूकेमधील काउंटी डरहॅम आणि डार्लिंग्टन एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट येथे क्लिनिकल फेलो म्हणून काम केले होते. ते ब्रिटिश मेडिकल असोसिएशनशी संबंधित होते. यापूर्वी ते ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे सचिव म्हणून काम करत होते. नंतर ते नॉर्दर्न रेसिडेंट डॉक्टर्स समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम करत होते. पगाराची रचना आणि 'कनिष्ठ डॉक्टरां'ना 'निवासी डॉक्टर' म्हणून घोषित करणे यासारख्या मुद्द्यांचे त्यांनी समर्थन केले होते.

Web Title: Indian Origin 26-year-old Doctor Sulaymaan Al Majid Among 2 killed In UAE Plane Crash with Pakistani woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.