Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 10:35 AM2019-09-04T10:35:09+5:302019-09-04T10:43:58+5:30

पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे.

Indian embassy in London vandalised as protest over Kashmir turns violent | Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

Next
ठळक मुद्देपाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी लक्ष्य केलं आहे. इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली.भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लंडन - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले असून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी जवळपास 10 हजार पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या  इमारतीला लक्ष्य केलं. 'काश्मीर फ्रीडम मार्च'  असं नाव पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला दिलं होतं. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. याचं नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केलं.

मोठ्या संख्येने पाकिस्तानी समर्थक या मोर्चामध्ये सामील झाले होते. समर्थकांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)चे झेंडे होते. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करून माहिती दिली आहे. याआधीही 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शनं केली होती. 

पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापार बंदीला एक महिना झाला तोवर पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेनंतर पाकिस्तानने मंगळवारी भारतातून अंशत: व्यापारावरील  बंदी उठविली आहे. पाकिस्तानने मंगळवारी भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान भारताला फळे, सिमेंट, खनिज, चमड्याच्या वस्तू. रबर, अल्कहोल पेय, चिकित्सा उपकरण या प्रकारच्या अनेक वस्तू निर्यात करतं. तर भारत पाकिस्तानला जैविक रसायन, प्लास्टिक उत्पादन, धान्य, साखर, कॉफी, चहा, लोह आणि स्टीलचे सामान, औषधे इ. वस्तू निर्यात करते. 

Pakistan Restores Partial Trade With India, allow imports of life saving medicines | पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधे आयात करते. या जीवनावश्यक औषधात साप, कुत्रा यांच्या विषापासून वाचवण्याचं औषधासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावं लागतं. जुलै महिन्यात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 16 महिन्याच्या कालावधी भारताकडून 250 कोटींहून अधिक किमतीचा व्यापार विषापासून वाचविणाऱ्या औषधांवर केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017-18 मध्ये 2.4 अरब डॉलर व्यापार झाला होता. द्विपक्षीय व्यापारात जवळपास 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये भारतीय निर्यात वस्तूंचा असतो. 

 

Web Title: Indian embassy in London vandalised as protest over Kashmir turns violent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.