थरारक बचाव मोहीम, इस्राइलने पॅलेस्टाइनच्या तावडीतून केली १० भारतीयांची सुटका, एक महिन्यापासून होते कैदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:36 IST2025-03-07T16:35:05+5:302025-03-07T16:36:52+5:30
Indian Construction Workers Rescued By Israel: पॅलेस्टाइनी लोकांनी बंदी बनवून ठेवलेल्या १० भारतीयांची इस्लाइलच्या लष्कराने रात्री एक विशेष मोहीम राबवून सुटका केली. या भारतीयांकडील पासपोर्ट काढून घेऊन त्यांना वेस्ट बँकमधील एका गावामध्ये मागच्या महिनाभरापासून कैदेत ठेवण्यात आले होते.

थरारक बचाव मोहीम, इस्राइलने पॅलेस्टाइनच्या तावडीतून केली १० भारतीयांची सुटका, एक महिन्यापासून होते कैदेत
पॅलेस्टाइनी लोकांनी बंदी बनवून ठेवलेल्या १० भारतीयांची इस्लाइलच्या लष्कराने रात्री एक विशेष मोहीम राबवून सुटका केली. या भारतीयांकडील पासपोर्ट काढून घेऊन त्यांना वेस्ट बँकमधील एका गावामध्ये मागच्या महिनाभरापासून कैदेत ठेवण्यात आले होते.
सुटका करण्यात आलेले सर्व भारतीय नागरिक हे बांधकाम कामगार असून, त्यांना खोटं बोलून बंदी बनव्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. या दहा भारतीयांना वेस्ट बँक येथील अल जायेम गावात काम मिळेल असं सांगून नेण्यात आलं होतं. पॅलेस्टाइनमधील त्या गावात गेल्यानंतर त्यांच्याकडील पासपोर्ट काढून घेण्यात आले. दरम्यान, आपल्या पासपोर्टचा वापर पॅलेस्टाइनी नागरिक इस्राइलमध्ये घुसण्यासाठी करणार असल्याची माहिती या भारतीय नागरिकांना कैदेत असताना मिळाली होती.
दरम्यान, या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्राइल डिफेन्स फोर्सने रात्रभर शोधमोहीम राबवली आणि त्यांची पॅलेस्टाइनच्या तावडीतून सुटका केली. हे सर्व कामगार बांधाकम करण्यासाठी इस्राइलमध्ये गेले होते. मात्र ते कुठल्या ठिकाणी काम करत होते, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
सुटका करण्यात आलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आल्याचे आयडीएफकडून सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पासपोर्टचा गैरवापर करणाऱ्यांची ओळखही पटवण्यात आली असून, हे पासपोर्ट आता भारतीय नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.