शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:52 IST

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलंबियात दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हीरो आणि टीव्हीएससारख्या कंपन्यांचा गौरव केला.

मेडेलिन (अमेरिका) : कुणाशी तरी हातमिळवणी आणि संगनमत करून नव्हे, तर भारतीय कंपन्या नवोन्मेष तसेच विविध शोधांच्या बळावर जागतिक पातळीवर विजय मिळू शकतात, अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलंबियात दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हीरो आणि टीव्हीएससारख्या कंपन्यांचा गौरव केला.

राहुल गांधी आपल्या चार देशांच्या यात्रेत सध्या अमेरिकेतील कोलंबियात असून, त्यांनी सोशल मीडियावर नुकतेच एक छायाचित्र शेअर केले. यात ते बजाज पल्सर दुचाकीच्या समोर उभे असल्याचे दिसत आहे. या भारतीय कंपन्या कोलंबियात करीत असलेल्या कामगिरीबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी मेडेलिनमध्ये ईआयए विद्यापीठात आयोजित एका परिसंवादात बोलताना सांगितले की, भारतात एक प्राचीन आध्यात्मिक परंपरा व एक विशिष्ट विचारप्रणाली आहे. आजच्या आधुनिक युगासाठी ती लाभदायी आहे. या माध्यमातून भारत जगाला खूप काही देऊ शकतो.

भारताबाबत आशावादीराहुल यांनी आपण भारताबाबत खूप आशावादी असल्याचे सांगून भारतीय व्यवस्थेत काही कच्चे दुवे असल्याचे ते म्हणाले. यामुळे काही प्रमाणात जोखीम असली तरी भारताला त्यावर मात करावी लागेल, असे त्यांनी नमूद केले.

विविध धर्म, भाषेचा विचारभारतात विविध धर्म आणि विविध भाषा ही एक जोखीम असल्याचे सांगून या विविध परंपरांची जोपासना करून त्यांना व्यक्त होण्यासाठी विशिष्ट स्थान देणे भारतासारख्या देशात महत्त्वाचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

चीनशी स्पर्धा हवीअमेरिकेच्या वर्चस्वाला दिले जात असलेल्या आव्हानांबाबत म्हणाले की, भारताला लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून उत्पादनात चीनशी स्पर्धा करावी लागेल. रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्याची गरज आहे.

एआयमुळे नवा रोजगारराहुल गांधी म्हणाले, आता केवळ एआयमुळे रोजगार नष्ट होतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे सांगून उलट यातून नवे रोजगारही उपलब्ध होतील. यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल, असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Praises Indian Bikes on American Roads, Hails Companies

Web Summary : Rahul Gandhi lauded Bajaj, Hero, and TVS in Colombia for their innovation in motorcycle manufacturing. He expressed pride in their global achievements and emphasized India's potential to contribute to the modern world through its spiritual traditions. He also mentioned the need for India to compete with China and create more jobs.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbikeबाईकIndiaभारतAmericaअमेरिका