भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:50 IST2022-08-16T16:46:51+5:302022-08-16T16:50:31+5:30
भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ असलेल्या पेंगाँग लेकमध्ये मंगळवारी चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे.

भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203!
भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ असलेल्या पेंगाँग लेकमध्ये मंगळवारी चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पेंगाँग लेकमध्ये एक खास बोट उतरवण्यात आली आहे. या बोटींच्या माध्यमातून गरज पडल्यास भारतीय लष्कर चीनच्या कोणत्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देऊ शकणार आहे. यासोबतच मंगळवारी भारतीय लष्कराला अँटी पर्सनल माइन्स, ड्रोन, एके-203 रायफल्स आणि एफ इनसास रायफल्सही मिळाल्या आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी भारतीय लष्कराला पेंगाँग लेकवर विशेष उतरवण्यात आली. भारतीय लष्कर या बोटीचा वापर करुन लँडिंग क्राफ्ट अटॅक ड्रिलही केले गेले. या विशेष बोटीमध्ये एकाच वेळी ३५ जवान चढू शकतात. ही बोट अतिशय आधुनिक आहे. यामध्ये ३५ सैनिक एकावेळी प्रवास करत पेंगाँग लेकच्या कोणत्याही भागात पोहोचू शकतात. यासाठी अत्यंत कमीत कमी वेळात ते शत्रुच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतात.
भारतीय लष्कराच्या ताफ्यात ड्रोन अन् युद्ध वाहनही
भारतीय लष्कराला एलओसीजवळ सुरक्षा मजबूत करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले ड्रोनही मिळाले आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून एलओएसीच्या आजूबाजूच्या भागावर सहज नजर ठेवली जाऊ शकते. यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही गस्त घालण्यासाठी विशेष प्रकारची लढाऊ वाहनं देखील लष्कराकडे सुपूर्द केली आहेत. यामुळे चिनी सैन्याला कोणत्याही परिस्थितीत चोख प्रत्युत्तर देता येईल.
याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अँटी पर्सनल माईन निपुणही लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अशा सुमारे ७ लाख भूसुरुंग लष्कराच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासोबतच अमेठीत रशिया आणि भारत संयुक्तपणे एके-203 रायफल्स बनवणार आहेत. मंगळवारी याचे सादरीकरण करण्यात आले. राजनाथ सिंह म्हणाले की, ही यंत्रणा आणि उपकरणे भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्याच्या ऑपरेशनल तयारीला अधिक बळकट करतील.