शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
3
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
4
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
5
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
6
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
7
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
9
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
11
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
12
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
13
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
14
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
17
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
18
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:58 IST

पाकिस्तानचा एक अतिशय महत्वाचा एअर बेस सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धविराम ...

पाकिस्तानचा एक अतिशय महत्वाचा एअर बेस सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धविराम असला तरी, आधी झालेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडवली आहे. भारताने केलेल्या प्रत्युत्तरच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 'रहीम यार खान' या महत्वाच्या लष्करी एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. आता पाकिस्तानने हा एअरबेस एका आठवड्यासाठी बंद केल्याचे म्हटले जात आहे. 

पाकिस्तानी विमान वाहतूक विभागाने शनिवारी संध्याकाळी एक नोटिस जारी केली होती. या नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, एअरबेसची मुख्य धावपट्टी १० ते १८ मेपर्यंत बंद राहील. सध्या या धावपट्टीवर काही काम सुरू आहे, म्हणून ती बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरूनच लक्षात येत आहे की, भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या महत्त्वाच्या धावपट्टीचे मोठे नुकसान झाल्यामुळेच आता दुरुस्तीसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

भारतीय सैन्याने दाखवली स्थिती!

रविवारी संध्याकाळी भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतही काही व्हिडीओ आणि फोटो दाखवले गेले, ज्यात पाकिस्तानच्या रहीम यार खान एअरबेसचे बरेच नुकसान झाल्याचे दिसले होते. पाकिस्तानच्या याच एअरबेसवर शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. मात्र, आता हा एअरबेस आता आठवडाभरासाठी बंद राहणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चार दिवस संघर्ष सुरू होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला होता. यानंतर पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय सैन्याने हे सगळे हल्ले परतवून लावले. प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात भारतीय सेनेने पाकिस्तानच्या ६ लष्करी तळांवर हल्ला केला.    

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकindian air forceभारतीय हवाई दलOperation Sindoorऑपरेशन सिंदूर