भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:33 IST2025-08-06T10:32:45+5:302025-08-06T10:33:12+5:30
Donald Trump Vs India: एएनआयच्या पत्रकाराने ट्रम्पना व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेच प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले.

भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
भारतरशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे आरोप करत भारतावर टॅरिफ आणि दंड लादणारे ट्रम्प मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत चांगलेच तोंडावर आपटले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने प्रश्न विचारताच अमेरिकारशियाकडून काय काय मागवतो याची आपल्याला माहिती नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार प्रत्यूत्तर देताना खुद्द अमेरिका रशियाकडून यूरेनियम हेक्साफ्लोराइड, अन्नधान्य आणि केमिकल्स मागवत असल्याचा आरोप केला होता. यावर एएनआयच्या पत्रकाराने ट्रम्पना व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेच प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. तसेच आम्हाला याची चौकशी करावी लागेल असे म्हटले आहे.
याचाच अर्थ भारतावर रशियाकडून कच्चे तेल घेतो असे आरोप करणाऱ्या ट्रम्पना स्वत:चा देश रशियाकडून काय काय घेतो याची माहिती नाही हे हास्यास्पद आणि तेवढेच लाजिरवाणे देखील आहे.
भारताचे पश्चिमी देशांना जोरदार प्रत्यूत्तर...
आमच्यावर टीका करणारे देश स्वतः रशियाशी खूप व्यापार करत आहेत, तेही कोणत्याही सक्तीशिवाय. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, भारताला रशियाकडून तेल खरेदी करावे लागले कारण त्याचे जुने तेल पुरवठादार युरोपला पुरवठा करू लागले होते. त्यावेळी, अमेरिकेने भारताला असे करण्यास प्रोत्साहित केले होते. २०२४ मध्ये, युरोपियन युनियनने रशियासोबत सुमारे ८५ अब्ज युरोचा व्यापार केला. त्याचप्रमाणे, अमेरिका आपल्या अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने रशियाकडून आयात करत आहे, असा आरोप भारताने केला होता.