थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:02 IST2026-04-08T13:02:08+5:302026-04-08T13:02:56+5:30

थायलंडचे किंग आणि क्वीन यांचा निरोप घेतल्यानंतर राजदूत नागेश सिंह यांनी देशाचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांचीही भेट घेतली.

Indian ambassador went to meet the King of Thailand; the officer sat on his knees in front of him, why? | थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?

थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?

थायलंडमधीलभारतीय राजदूत नागेश सिंह यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी देशाचे महाराजे आणि महाराणी यांची भेट घेतली. थायलंडमधीलभारतीय दूतावास कार्यालयाने हे फोटो शेअर केलेत. १९९५ बॅचमधील आयएफएस अधिकारी नागेश सिंह यांची ऑगस्ट २०२२ मध्ये थायलंडमधील राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती. थायलंडमध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नागेश सिंह यांनी किंग आणि क्वीन यांची भेट घेत त्यांचा सन्मानाने निरोप घेतला.

एक अधिकारी गुडघ्यावर बसला

भारतीय दूतावासाने शेअर केलेल्या फोटोत थायलंडचे किंग आणि क्वीन यांच्यासमोर एक अधिकारी गुडघ्यावर बसल्याचे चित्र दिसत आहे. या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले. इतक्या मोठ्या पदावरचा अधिकारी गुडघ्यावर का बसलाय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मागचं कारण म्हणजे थायलंडमध्ये राजघराण्यातील व्यक्तींसमोर अशाप्रकारे बसून त्यांना सन्मान दिला जातो. राजघराण्यासमोर उच्चस्तरीय सैन्य अथवा प्रशासकीय अधिकारी गुडघ्यावर बसून त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करतो. या प्रथेला तिथल्या भाषेत ग्राब म्हटलं जाते. ही थायलंडमधील खूप जुनी परंपरा आहे.

थायलंडचे किंग आणि क्वीन यांचा निरोप घेतल्यानंतर राजदूत नागेश सिंह यांनी देशाचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांचीही भेट घेतली. राजदूत नागेश सिंह यांनी दोन्ही देशांमधील बहुआयामी सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि खंबीर पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. थायलंडमधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्तीपूर्वी नागेश सिंह जुलै २०१८ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत परराष्ट्र खात्यात चीफ ऑफ प्रोटोकॉलपदी कार्यरत होते अशी माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे. 

नागेश सिंह यांनी डिप्लोमॅटिक करिअर काळात अटलांटा येथे भारताचे कॉन्सुल जनरल(जून २०१५ - जून २०१८), भारताच्या उपराष्ट्रपतींचे सहसचिव/विशेष कार्य अधिकारी (सप्टेंबर २०१२ - जून २०१५), परराष्ट्र मंत्रालयात संचालक (पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण) (फेब्रुवारी २०१० - ऑगस्ट २०१२), न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमध्ये सल्लागार (जून २००६ - फेब्रुवारी २०१०), भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव (जून २००३ - मे २००६) आणि परराष्ट्र मंत्रालयात अवर सचिव (पाकिस्तान) (सप्टेंबर २००२ - मे २००३) म्हणून सेवा बजावली आहे.

Web Title : भारतीय राजदूत ने थाई शाही परिवार को विदाई दी; अधिकारी घुटनों पर।

Web Summary : भारतीय राजदूत नागेश सिंह ने थाईलैंड में अपना कार्यकाल पूरा किया और राजा और रानी से मिले। एक तस्वीर में एक अधिकारी उनके सामने घुटने टेके हुए दिखाया गया, जो 'ग्राब' नामक थाई रिवाज है, जो शाही परिवार के प्रति सम्मान दर्शाता है। सिंह ने प्रधानमंत्री से भी मुलाकात की।

Web Title : Indian Ambassador bids farewell to Thai Royals; official kneels.

Web Summary : Indian Ambassador Nagesh Singh concluded his Thailand tenure, meeting the King and Queen. A photo showed an official kneeling before them, a Thai custom called 'Grab' to show respect to royalty. Singh also met the Prime Minister.