शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:34 IST

Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं.यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते.

रविवारी तालिबाननंअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर बिघडलेली परिस्तिती पाहता भारतानं त्या ठिकाणी असलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली होती. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचं विमान जवळपास १२० भारतीयांना काबुलवरून जामनगर येथे घेऊन आलं. महत्त्वाची बाब ही की अफगाणिस्तानमधील भारताचे राजदुत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. हवाई दलाचं C-17 हे विमान जामनगर येथे उतरवण्यात आलं. 

भारतीय हवाई दलाचं C-17 हे विमान हे विमान मंगळवारी सकाळी काबुलहून रवाना झालं होतं. यामध्ये भारतीय दुतावासातील कर्मचारी, त्या ठिकाणी असणारे सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांचा समावेश होता. गुजरातमधील जामनगर येथे उतरल्यानंतर या विमानाचं स्वागत करण्यात आलं. अफगाणिस्तानमधून परत आलेल्या लोकांचं फुलांच्या माळा घालून स्वागत करण्यात आलं. तसंच यानंतर बसमध्ये बसल्यावर सर्वांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.

बिघडलेली परिस्थिती पाहता काबुल विमानतळावर विमानांचं उड्डाण बंद करण्यात आलं होतं. परंतु अमेरिकन लष्कराद्वारे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा विमानांची ये-जा सुरू करण्यात आली. यानंतरच भारतीय विमान या ठिकाणाहून उड्डाण घेऊ शकलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांना परत आणलं जात असल्याचं दिसत आहे. भारत सरकारद्वारे अफगाणिस्तानसाठी निराळ्या मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  याशिवाय अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहे. काबुलच्या एका फॅक्टरीमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक जण अडकल्याची माहिती आहे. त्यांनी भारत सरकारला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. कंपनीच्या मालकानं त्यांचे पासपोर्टही आपल्याकडे ठेवून घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, गृहमंत्रालयानं व्हिसाच्या नियमांमध्ये काही सूट दिली आहे. अफगाणिस्तानहून भारतात येणाऱ्या लोकांसाठी एक विशेष श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्यांना व्हिसा घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानairforceहवाईदलIndiaभारतGujaratगुजरात