भारत-अमेरिकेत वर्ष अखेरपर्यंत व्यापार करार होण्याची अपेक्षा; वरिष्ठ भारतीय मुत्सद्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:58 AM2019-11-09T05:58:53+5:302019-11-09T05:59:07+5:30

आपल्या दौऱ्यात ते वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क या दोन्ही शहरांना भेटी देणार आहेत

 India-US trade deal expected by the end of the year; Information on senior Indian diplomat | भारत-अमेरिकेत वर्ष अखेरपर्यंत व्यापार करार होण्याची अपेक्षा; वरिष्ठ भारतीय मुत्सद्याची माहिती

भारत-अमेरिकेत वर्ष अखेरपर्यंत व्यापार करार होण्याची अपेक्षा; वरिष्ठ भारतीय मुत्सद्याची माहिती

Next

न्यूयॉर्क : हे वर्ष संपायच्या आत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करार होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती एका वरिष्ठ भारतीय मुत्सद्याने दिली. वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासातील वरिष्ठ मुत्सद्दी (वाणिज्य) मनोजकुमार मोहापात्रा यांनी सांगितले की, वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल हे पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देत आहेत. ते व्यापारी करारावर चर्चा करणार आहेत.

आपल्या दौऱ्यात ते वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क या दोन्ही शहरांना भेटी देणार आहेत. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात मोहापात्रा यांनी सांगितले की, व्यापारी कराराच्या मुद्यावर आम्ही अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालय आणि राजदूत रॉबर्ट लायटायझर यांच्याशी चर्चेच्या कित्येक फेºया केल्या आहेत. आम्ही ही चर्चा सुरूच ठेवणार आहोत. या वर्षाच्या अखेरपर्यंत करारावर स्वाक्षºया करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. या प्रस्तावित करारामुळे दोन्ही देशांतील व्यापारी संबंधास गती मिळेल. इंडियन अमेरिकन इंटरनॅशनल चेंबर आॅफ कॉमर्सच्या ईशान्य न्यूयॉर्क विभागीय शाखेचे उद्घाटन मोहापात्रा यांच्या उपस्थितीत झाले. 

द्विपक्षीय व्यापारात वाढ शक्य
मोहापात्रा यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांचे द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत. दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांत वाढ करण्यास भरपूर संधी आहेत. त्यामुळे वर्ष अखेरपर्यंत व्यापारी करार होऊ शकतो, अशी आशा दोन्ही देशांना वाटते. दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार सध्या १५0 अब्ज डॉलरचा आहे. त्यात दरवर्षी १0 टक्के वाढ होत आहे. २0१८-१९ मध्ये भारताची अमेरिकेला निर्यात ५२.४ अब्ज डॉलरची होती. तसेच आयात ३५.५ अब्ज डॉलरची होती.

Web Title:  India-US trade deal expected by the end of the year; Information on senior Indian diplomat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.