भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:41 IST2025-06-03T14:41:00+5:302025-06-03T14:41:39+5:30
India-Russia Relation: भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. रशियाने वेळोवेळी भारताला मदत केली आहे. ही मैत्री अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहे.

भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
India-Russia Relation: भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. रशियाने प्रत्येकवेळी भारताला मदत केली आहे. या मैत्रीत नेहमी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतो. आता जागतिक भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात अमेरिकेचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर यायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचे भारताबद्दल एक धक्कादायक विधान समोर आले आहे. यामध्ये ते रशियाकडून शस्त्रे खरेदी करण्यास आणि भारत ब्रिक्सचा सदस्य असल्याबद्दल आक्षेप घेत आहेत.
भारताने नेहमीच अमेरिका आणि रशिया दोघांशीही चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, कोणत्याही दबावाशिवाय भारताने आपले हितसंबंध साधले आहेत. पण, यामुळेच अमेरिकेला त्रास होऊ लागला आहे. अमेरिकेच्या नाराजीचे खरे कारण रशियाकडून शस्त्रे खरेदी करणे असल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन सतत भारतविरोधी विधाने करत आहे.
अमेरिकन मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
वॉशिंग्टन डीसी येथे एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले, "भारत सरकारने काही गोष्टी केल्या आहेत, ज्यांचा सामान्यतः अमेरिकेवर वाईट परिणाम होतो." उदाहरण देताना ते म्हणाले, "तुम्ही सामान्यतः तुमची लष्करी उपकरणे रशियाकडून खरेदी करता. जर तुम्ही रशियाकडून तुमची शस्त्रे खरेदी करणार असाल, तर हा अमेरिकेला त्रास देण्याचा एक मार्ग आहे."
#WATCH | Washington DC | US Secretary of Commerce Howard Lutnick says, "...There were certain things that the Indian government did that generally rubbed the United States the wrong way. For instance, you generally buy your military gear from Russia. That's a way to kind of get… pic.twitter.com/CxoqRZQLJ2
— ANI (@ANI) June 3, 2025
ते पुढे म्हणाले की, "अमेरिकेतील लोकांवर मित्र बनवण्याचा आणि प्रभाव पाडण्याचा हा मार्ग नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर थेट भाष्य केले आहेत. त्यांनी भारत सरकारला या समस्येकडे लक्ष देण्याचा आणि परिस्थिती सुधारण्याचा सल्लाही दिला आहे."
रशिया भारत मैत्रीमुळे अमेरिका अस्वस्थ
अमेरिका रशियाला आपला शत्रू मानते. तसेच, अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. भारताकडून शस्त्रे खरेदी करणे आणि ब्रिक्सचा सदस्य असणे, रशियाची ताकद वाढवत आहे. म्हणूनच, अमेरिकेने आजकाल भारतविरोधी विधाने सुरू केली आहेत.