India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:40 IST2025-05-23T09:40:38+5:302025-05-23T09:40:52+5:30
India Pakistan War : भारताने पाकिस्तानचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. पाणी पुन्हा सुरू करण्याची मागणी पाकिस्तानकडून होत आहे.

India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
India Pakistan War : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारताने पाकिस्तावर अनेक निर्बंध लादले आहे. सिंधू जल करार स्थगित करुन सर्वात आधी भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. दरम्यान, आता पाकिस्तानी लष्कराने आता दहशतवाद्यांची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्या प्रक्षोभक आणि हिंसक वक्तव्यासारखीच भाषा वापरून भारताला उघडपणे धमकी दिली आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याच्या प्रतिक्रियेत त्यांनी एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले.
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
अहमद शरीफ चौधरी म्हणाले, "जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचे श्वास बंद करु. हे विधान त्यांनी केले. काही दिवसापूर्वी हे विधान दहशतवादी हाफिज सईदनेही केले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत आहे.
भारत सरकारने २३ एप्रिल या दिवशी सिंधू जल करार स्थगित केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने हे पाऊल उचलले. यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले.
दहशतवादाविरोधात कडक पाऊले
१९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला हा करार दोन्ही देशांमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे नियंत्रण करतो . तसेच दोन्ही पक्षांनी नियमितपणे पाण्याच्या वापराविषयी माहिती शेअर करणे आवश्यक आहे.
भारताने अनेकवेळा पाकिस्तानला दहशतवादाबाबत सांगितले आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही असं भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. भारताने आता दहशतवादाविरोधात कडक पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.
🔴#BREAKING Pakistani military spokesperson @OfficialDGISPR is at a university in Pakistan delivering hate and violence-encouraging speeches against India echoing what terrorist Hafiz Saeed said some years ago !
— Taha Siddiqui (@TahaSSiddiqui) May 22, 2025
Shameful! pic.twitter.com/W7ckNPePOH