शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

भारत-पाक युद्ध आता टळले, पण मला श्रेय मिळणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखतीत व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:23 IST

"मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण..."

न्यूयॉर्क : मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण मला कधीच त्याचे श्रेय दिले जाणार नाही, अशी खंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारत, पाकिस्तानमध्ये प्रचंड द्वेष आहे. ते दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. संघर्ष सुरू झाल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला. दोघेही परस्परांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत होते. आम्हीच अधिक सामर्थ्यवान असा त्या देशांचा दावा होता. त्यातून अण्वस्त्रांचा वापर होण्याचाही धोका वाढला होता. ते म्हणाले की, परस्परांच्या विरोधात लढणाऱ्या भारत, पाकिस्तानशी मी व्यापाराबद्दल बोललो. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी व्यापार हा मुद्दा तुमच्यासमोर ठळकपणे मांडतोय, असेही त्यांना सांगितले. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनावर भारतात टीकापहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उडवून दिले. त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली.शस्त्रसंधी झाल्याची घोषणा दोन्ही देशांनी करण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली. भारत व पाकिस्तानच्या चर्चेत अमेरिकेने मध्यस्थी केली, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वर्तनावर भारतातील विरोधी पक्षांनी टीका केली. 

भारत १००% टॅरीफ कमी करण्यास तयारभारत सरकारने अमेरिकन वस्तूंवरील टॅरीफ १०० टक्के कमी करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भारत व अमेरिकेत लवकरच व्यापार करार होणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. भारतासोबत व्यापार करार होणार असल्याचा दावा करीत असले तरी प्रस्तावित करारासाठी घाई नसल्याचे त्यांनी चॅनेलवरील मुलाखतीत सांगितले. सर्वाधिक शुल्क लावणाऱ्या देशांपैकी भारत एक असल्याचा आरोप पुन्हा एकदा ट्रम्प यांनी केला. अशा परिस्थितीत व्यापार करणे जवळपास अशक्य असल्याचे स्पष्ट करीत भारत १०० टक्के टॅरीफ कमी करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतPakistanपाकिस्तान