पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 00:59 IST2025-05-09T00:58:33+5:302025-05-09T00:59:06+5:30

India-Pakistan Tension : बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने कराची बंदर अन् क्वेटामध्ये पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत.

India-Pakistan Tension: After the Indian Army, the Baloch Army also attacked Pakistan | पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...

पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...

India-Pakistan Tension : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. आज अचानक पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. अशातच आता पाकिस्तानची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी जाली आहे. 

बलोच आर्मीचे पाक सैन्यावर हल्ले
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. तसेच, सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली एक गॅस पाइपलाइन देखील उडवून दिली आहे. एकीकडे भारतीय सैन्य पाकिस्तावर हल्ले करत आहे, तर दुसरीकडे बलोच आर्मीकडून पाकला दणक्यावर दणके बसत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

भारताच्या हल्ल्यात पाकची संरक्ष प्रणाली नष्ट
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची दाणादाण झाली आहे. भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बलुचिस्तानमधील बीएलएने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी राजवटीची अंतर्गत कमकुवततादेखील जगासमोर आली आहे. 

पाकिस्तानचे दोन तुकडे होणार?
बीएलएचा हा हल्ला म्हणजे बलुचिस्तानची बंडखोरी आता निर्णायक वळणावर पोहोचत असल्याचे लक्षण आहे. पाकिस्तान बऱ्याच काळापासून  बलुचिस्तानच्या नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, हा हल्ला दर्शवितो की पाकिस्तानी सैन्य आता दोन आघाड्यांवर अडकले आहे. 

विश्लेषकांचे मत आहे की जर पाकिस्तानने बलुचिस्तानमधील परिस्थिती गांभीर्याने घेतली नाही, तर हे हल्ले मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. ऑपरेशन सिंदूरनंतर, तेथील फुटीरतावादी संघटना पाकिस्तानच्या लष्करी अपयशाचा फायदा घेऊन पाकिस्तानचे दोन तुकडे करू शकतात. पुढे काय होईल, हे लवकरच कळेल.

Web Title: India-Pakistan Tension: After the Indian Army, the Baloch Army also attacked Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.